Motorola आपल्या ‘जी’ सीरीजच्या नवीन स्मार्टफोनवर काम करत आहे ज्याला Moto G85 5G नावाने लाँच केले जाईल. कंपनीने सध्या या 5 जी फोनला पडद्यामध्ये ठेवले आहे परंतु मागच्या अनेक दिवसांमध्ये हा डिव्हाईस अनेक सर्टिफिकेशन साईटवर आला आहे. तसेच आता एक नवीन लीकमध्ये लाँचच्या आधी ही मोटो जी 85 5 जी ची किंमत पण समोर आली आहे.
Moto G85 5G किंमत (लीक)
मोटोरोला मोटो जी85 5जी बद्दल सांगण्यात आले आहे की या फोनचा 12GB RAM + 256GB Memory व्हेरिएंट जागतिक मार्केटमध्ये EUR 349 मध्ये लाँच केला जाऊ शकतो. ही किंमत भारतीय चलनानुसार 31,000 रुपयांच्या आसपास आहे. परंतु या गोष्टीची आशा आहे की Moto G85 5G भारतातील किंमत जागतिक बाजारापेक्षा कमी ठेवली जाईल. हा मोबाईल Surf (Blue), Gray आणि Olivin कलरमध्ये लाँच होऊ शकतो.
Moto G85 5G चे स्पेसिफिकेशन (लीक)
- 6.8″ फुलएचडी+ ओएलईडी स्क्रीन
- क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 4 जेन 3 प्रोसेसर
- 12 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज
- 50 मेगापिक्सल रिअर कॅमेरा
- 32 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा
- 5,000 एमएएच बॅटरी
प्रोसेसर : Moto G85 अलीकडेच सर्टिफिकेशन साईट टेनावर लिस्ट झाला होता, या फोनमध्ये 2.3GHz क्लॉक स्पीड असलेला ऑक्टा-कोर प्रोसेसर दिला जाणार असल्याची माहिती समोर आली होती. तसेच गीकबेंच लिस्टिंगमध्ये याला Qualcomm Snapdragon 4 Gen 3 चिपसेटसह सांगण्यात आले आहे.
स्क्रीन : मोटो जी85 ला टेनावर 6.8-इंचाच्या फुलएचडी+ स्क्रीनसह दाखविण्यात आले आहे. लिस्टिंगनुसार फोनमध्ये curved-edge स्क्रीन दिली जाईल जो OLED पॅनलवर बनली आहे. स्मार्टफोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर टेक्नॉलॉजी पण दिली जाऊ शकते.
बॅक कॅमेरा : फोटोग्राफीसाठी नवीन मोटोरोला स्मार्टफोनमध्ये ड्युअल रिअर कॅमेरा मिळेल. लीकनुसार याच्या बॅक पॅनलवर 50 मेगापिक्सल प्रायमरी सेन्सर दिला जाईल जो 8 मेगापिक्सल सेकंडरी सेन्सरसह मिळून काम करेल.
फ्रंट कॅमेरा : टेना लिस्टिंगमध्ये समोर आले आहे की सेल्फी तसेच व्हिडिओ कॉलिंगसाठी Moto G85 स्मार्टफोन 32 मेगापिक्सल फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करेल.
बॅटरी : पावर बॅकअपसाठी मोटो जी85 मध्ये 5,000mAh बॅटरी दिली जाणार असल्याची माहिती टेनावर मिळाली आहे. तसेच फोनमध्ये 33 वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी पाहायला मिळू शकते.
