Home बातम्या 32MP Selfie आणि 108MP Back Camera सह हा स्टायलिश स्मार्टफोन झाला लाँच, पाहा लूक

32MP Selfie आणि 108MP Back Camera सह हा स्टायलिश स्मार्टफोन झाला लाँच, पाहा लूक

Huawei ने अलीकडेच Nova 12s आणि Nova 12i स्मार्टफोन जागतिक बाजारामध्ये सादर केले होते. दोन्ही स्मार्टफोन जबरदस्त स्पेसिफिकेशन्ससह आले होते, तसेच आज कंपनीने मलेशियामध्ये ‘नोवा 12’ सीरिजचा ही Nova 12 SE फोन लाँच केला आहे जो 108MP Back Camera आणि 32MP Front Camera सह आहे.

Huawei Nova 12 SE चा कॅमेरा

बॅक कॅमेरा: नोवा 12एसई ट्रिपल रिअर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. याच्या बॅक पॅनलवर एफ/1.9 अपर्चर असलेला 108 मेगापिक्सल प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो एफ/2.2 अपर्चर असणाऱ्या 8 मेगापिक्सल अल्ट्रा वाईड अँगल लेन्स तसेच एफ/2.4 अपर्चर असणारा 2 मेगापिक्सल मॅक्रो सेन्सरसह मिळून चालतो.

फ्रंट कॅमेरा: सेल्फी काढणे तसेच रिल्स बनविण्यासाठी Huawei Nova 12 SE 32 मेगापिक्सल सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. हा एफ/2.45 अपर्चरवर काम करणारा सेन्सर आहे ज्यात नाईट मोड, पोर्टरेट मोड, टाइम-लॅप्स आणि जेस्चर फोटो सारख्या फिचर्ससह अनेक फिल्टर्स पण मिळतात.

Huawei Nova 12 SE चे स्पेसिफिकेशन

डिस्प्ले: हुवावे नोवा 12एसई स्मार्टफोन 2400 × 1080 पिक्सल रेजोल्यूशन असणाऱ्या फुलएचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. ही स्क्रीन ओएलईडी पॅनलवर बनली आहे जी 90 हर्ट्झ रिफ्रेश रेटवर चालते.

प्रोसेसर: हा स्मार्टफोन 6 नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेल्या क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 680 ऑक्टाकोर प्रोसेसरवर लाँच झाला आहे जो 2.4 गीगाहर्ट्झ पर्यंतच्या क्लॉक स्पीडवर चालतो. तसेच ग्राफिक्ससाठी फोनमध्ये एड्रेनो 610 जीपीयू मिळतो.

बॅटरी: पावर बॅकअपसाठी Huawei Nova 12 SE स्मार्टफोन 4,500 एमएएच बॅटरीला सपोर्ट करतो. तसेच ही मोठी बॅटरी फास्ट चार्ज करण्यासाठी फोनमध्ये 66 वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी पण मिळते.

Huawei Nova 12 SE ची किंमत

मलेशियामध्ये हुवावे नोवा 12 एसई स्मार्टफोन 8जीबी रॅमवर लाँच झाला आहे जो 256 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. या मोबाईलची किंमत RM1,499 आहे जी भारतीय चलनानुसार 25,999 रुपयांच्या आसपास आहे. तसेच हुवावेचा हा फोन भारतीय बाजारात विकला जाणार नाही.