पोकोने गेल्यावर्षी भारतीय बाजारात स्वस्त 5 जी स्मार्टफोन POCO M6 5G लाँच केला होता जो 10,499 रुपयांच्या सुरुवाती किंमतीत विकला जात आहे. हा मोबाईल 4GB + 128GB, 6GB + 128GB आणि 8GB + 256GB व्हेरिएंट्समध्ये आला होता. तसेच आता बातमी मिळाली आहे की POCO M6 5G 4GB RAM + 64GB Memory मध्ये पण मिळेल तसेच यासाठी फक्त 8299 रुपये लागतील.
POCO M6 5G ची किंमत
या स्वस्त पोको एम 6 5 जी मॉडेलची माहिती आम्हाला टेक वेबसाईट गिजमोचायनाच्या माध्यमातून मिळाली आहे. रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की POCO M6 5G फोन 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज ऑप्शनमध्ये पण सेलसाठी उपलब्ध होईल तसेच याला 8,249 रुपयांमध्ये विकत घेता येईल. बातमीनुसार या नवीन मॉडेलची सेल शॉपिंग साईट फ्लिपकार्टवर होईल.
सर्वात स्वस्त 5 जी फोन
लक्षात घेण्यासारखे आहे की जर फोनच्या लाँचची किंमत अशीच राहिली तर POCO M6 5G सर्वात स्वस्त 5 जी स्मार्टफोन टॉप 3 लिस्टमध्ये सामिल होईल. या लिस्टमध्ये सध्या Lava Blaze 5G आणि itel P55 5G वरती आहे. तसेच समोर आलेल्या रिपोर्टमध्ये जो फ्लिपकार्ट टिझर शेअर करण्यात आला आहे त्यामध्ये किंमतीसह ‘*’ पण देण्यात आले आहे जो इशारा करतो की 8249 फोनची ऑफर किंमत असू शकते तसेच पोको एम 6 वास्तविक लाँचची किंमत काही जास्त असू शकते.
POCO M6 5G चे स्पेसिफिकेशन
- 6.74 इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले
- डायमेंसिटी 6100 प्लस चिपसेट
- 50MP ड्युअल रिअर कॅमेरा
- 5MP सेल्फी कॅमेरा
- 5000mAh बॅटरी
- अँड्रॉईड 13
किंमत: पोको एम6 5 जी फोनच्या 4 जीबी+128 जीबीला 9,249 रुपये, 6+128 मॉडेलला 9,999 रुपये तसेच सर्वात मोठ्या 8 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज मॉडेलला सध्या 10,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.
डिस्प्ले: POCO M6 5G फोनमध्ये 6.74 इंचाचा मोठा एचडी प्लस डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्यावर 90Hz रिफ्रेश रेट आणि प्रोटेक्शनसाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 मिळतो.
प्रोसेसर: मोबाईलमध्ये ब्रँडने मीडियाटेक डायमेंसिटी 6100 प्लस चिपसेट देण्यात आली आहे. ज्यामुळे युजर्सना जबरदस्त स्पीड आणि गेमिंग परफॉर्मन्स पण मिळतो.
स्टोरेज: स्टोरेजच्या बाबतीत डिव्हाईस 8GB रॅम +256 जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेजसह सादर करण्यात आला आहे फोनमध्ये रॅमला वाढवण्यासाठी टर्बोला सपोर्ट आणि इंटरनल स्टोरेजला वाढवण्यासाठी मायक्रो एसडी कार्ड स्लॉट दिले आहे. ज्याच्या मदतीने 1 टीबी पर्यंत स्टोरेज वाढवता येते.
कॅमेरा: कॅमेरा फिचर्स पाहता POCO M6 5G स्मार्टफोन ड्युअल रिअर कॅमेरा सेटअपसह आहे. ज्यात 50 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा लेन्स आणि एक AI कॅमेरा लावला आहे. तसेच, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी मोबाईलमध्ये 5 मेगापिक्सलचा AI फ्रंट कॅमेरा मिळतो.
बॅटरी: बॅटरीच्या बाबतीत स्मार्टफोन 5000mAh ची जास्त वेळ चालणारी बॅटरी आणि 18 वॉट फास्ट चार्जिंगचा सपोर्ट करतो. ज्याला चार्ज करण्यासाठी यूएसबी टाईप सी पोर्ट देण्यात आला आहे.
इतर: इतर फिचर्स पाहता POCO M6 5G मध्ये साईड माऊंटेड फिंगरप्रिंट सेन्सर, ड्युअल सिम 5G, ब्लूटूथ, वाय-फाय सारखे अनेक फिचर्स मिळतात.
ओएस: POCO M6 5G अँड्रॉईड 13 आधारित एमआईयुआय 14 वर चालतो त्याचबरोबर कंपनी दोन अँड्रॉईड अपडेट आणि 3 वर्षाचे सिक्योरिटी अपडेट देईल.
