Categories: बातम्या

लोकप्रिय ‘रेडमी नोट’ सीरिजमध्ये Redmi Note 11R लाँच

Redmi Note 11R Launch: Xiaomi सब-ब्रँड रेडमीची ‘नोट सीरिज’ बजेटमध्ये दमदार स्पेसिफिकेशन्स देण्यासाठी लोकप्रिय आहे. आता कंपनीनं ‘नोट 11’ सीरिजचा विस्तार करत एक नवीन स्मार्टफोन Redmi Note 11R लाँच केला आहे. हा हँडसेट 15 हजारांच्या बजेटमध्ये कंपनीच्या होम मार्केट चीनमध्ये सादर करण्यात आला आहे. रेडमी नोट 11आर स्मार्टफोनमध्ये Mediatek Dimensity 700 चिपसेट, 8GB RA, 90Hz डिस्प्ले आणि 5000mAh बॅटरी असे दमदार फीचर्स मिळतात.

Redmi Note 11R Specifications

रेडमी नोट 11आरचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा स्मार्टफोन 2408 x 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.58 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेवर लाँच झाला आहे. फोनची स्क्रीन एलसीडी पॅनलवर बनली आहे जी 90हर्ट्ज रिफ्रेश रेट व 240हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटवर चालते. या रेडमी फोनचे डायमेंशन 163.99×76.09×8.9 एमएम आणि वजन 201 ग्राम आहे. हे देखील वाचा: 15 हजारांच्या बजेटमध्ये तगडा Vivo Y73t 5G फोन; 12GB RAM सह 6,000mAh ची मोठी बॅटरी

Redmi Note 11R अँड्रॉइड 12 आधारित मीयुआय 13 वर चालतो. प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 2.2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेला ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे जो 7नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेल्या मीडियाटेक डिमेनसिटी 700 चिपसेटवर चालतो. ग्राफिक्ससाठी या रेडमी मोबाइलमध्ये माली जी57 जीपीयू देण्यात आला आहे.

फोटोग्राफीसाठी रेडमी नोट 11आर ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह एफ/2.2 अपर्चर असलेला 13 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो एफ/2.4 अपर्चर असलेल्या 2 मेगापिक्सलच्या पोर्टरेट लेन्ससह येतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा मोबाइल फोन 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Redmi Note 11R एक ड्युअल सिम फोन आहे ज्यात 3.5एमएम जॅक आणि आयआर ब्लास्टरसह अन्य बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्स देण्यात आले आहेत. सिक्योरिटीसाठी फोनच्या साइड पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर आहे. तसेच तरह पावर बॅकअपसाठी हा मोबाइल फोन 10वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेल्या 5,000एमएएच बॅटरीला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: 55 हजारांच्या OnePlus 10T 5G च्या जागी 5 रुपयांचा भांडी घासण्याचा साबण; ‘या’ सेलमध्ये झाली फसवणूक

Redmi Note 11R Price

रेडमी नोट 11आर स्मार्टफोन तीन व्हेरिएंट्समध्ये लाँच झाला आहे. फोनच्या बेस व्हेरिएंटमध्ये 4 जीबी रॅमसह 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे ज्याची किंमत RMB 1299 म्हणजे जवळपास 14,850 रुपये आहे. तर 6 जीबी रॅम व 128 जीबी स्टोरेज असलेला व्हेरिएंट RMB 1499 (जवळपास 17,200 रुपये) मध्ये लाँच करण्यात आला आहे आणि सर्वात मोठा Redmi Note 11R 8GB RAM + 128GB Storage 19,500 रुपयांच्या आसपास प्राइसवर लाँच झाला आहे जो RMB 1699 मध्ये चीनमध्ये विकत घेता येईल. हा रेडमी मोबाइल फोन चीनमध्ये Black, Grey आणि Blue कलरमध्ये उपलब्ध झाला आहे.

Published by
Siddhesh Jadhav