Vivo Y73t 5G फोन 12GB RAM आणि 6,000mAh च्या बॅटरीसह चीनमध्ये लाँच

Vivo Y73t 5G Phone Price Specifications Details Vivo Mobile Launch

विवो कंपनीनं आपल्या वाय सीरिजमध्ये स्मार्टफोन लाँच करण्याचा धडाका सुरूच ठेवला आहे. कंपनीनं या सप्टेंबर महिन्यात या सीरीजमध्ये अनेक स्मार्टफोन सादर केले आहेत. Vivo Y32t आणि Vivo Y52t 5G Phone ब्रँडचे हिट स्मार्टफोन काही दिवसांपूर्वीच लाँच झाले आहेत. तर आता या कंपनीनं नवीन विवो मोबाइल फोन Vivo Y73t 5G लाँच केला आहे. विवो वाय73टी 5जी 12GB RAM, MediaTek Dimensity 700 चिपसेट, 50MP Camera आणि 6,000mAh Battery सह बाजारात आला आहे ज्याची संपूर्ण माहिती आली आहे.

Vivo Y73t 5G Specifications

विवो वाय73टी स्मार्टफोन 20:9 अ‍ॅस्पेक्ट रेशियोवर लाँच झाला आहे जो 2408 × 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.58 इंचाच्या फुलएचडी प्लस डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोनची स्क्रीन आयपीएस एलसीडी पॅनलवर बनली आहे जी 60हर्ट्ज रिफ्रेश रेटवर चालते. या फोनचा स्क्रीन टू बॉडी रेशियो 90.6 टक्के आहे तसेच हा विवो मोबाइल 16.7एम कलर व 1500:1 कॉन्ट्रास्ट रेशियोला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: 55 हजारांच्या OnePlus 10T 5G च्या जागी 5 रुपयांचा भांडी घासण्याचा साबण; ‘या’ सेलमध्ये झाली फसवणूक

Vivo Y73t 5G Phone Price Specifications Details Vivo Mobile Launch

Vivo Y73t 5G Phone अँड्रॉइड 11 आधारित ओरिजन ओएस ओशियनवर चालतो. प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 2.2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टाकोर प्रोसेसरसह 7नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला मीडियाटेक डिमेनसिटी 700 चिपसेट देण्यात आला आहे. तसेच ग्राफिक्ससाठी हा मोबाइल फोन माली जी57 जीपीयूला सपोर्ट करतो.

Vivo Y73t 5G Phone Price Specifications Details Vivo Mobile Launch

फोटोग्राफीसाठी विवो वाय73टी 5जी फोन ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह एफ/1.8 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जोडीला एफ/2.4 अपर्चर असलेली 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा स्मार्टफोन एफ/2.0 अपर्चर असलेल्या 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Vivo Y73t 5G Phone ड्युअल सिमला सपोर्ट करतो जो 5जी व 4जी दोन्हीवर काम करतो. सिक्योरिटीसाठी यात साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी हा विवो मोबाइल फोन 6,000एमएएचच्या दमदार बॅटरीला सपोर्ट करतो ओजी 44वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येते. हे देखील वाचा: 50MP Camera आणि 13GB RAM च्या दमदार स्पेक्ससह लाँच झाला नवा फोन; किंमत 15 हजारांच्या आत

Vivo Y73t 5G Phone Price Specifications Details Vivo Mobile Launch

Vivo Y73t 5G Price

विवो वाय73टी 5जी फोन चीनमध्ये तीन व्हेरिएंट्समध्ये लाँच झाला आहे. बेस व्हेरिएंटमध्ये 8 जीबी रॅमसह 128 जीबी स्टोरेज देण्यात आली आहे ज्याची प्राइस CNY 1399 म्हणजे जवळपास 15,900 रुपये आहे. विवो वाय73टी 5जी चा 8जीबी रॅम व 256 जीबी स्टोरेज व्हेरिएंट CNY 1599 (जवळपास 17,900 रुपये) तर सर्वात मोठा Vivo Y73t 5G 12GB RAM + 256GB Storage CNY 1799 (जवळपास 20,900 रुपये) मध्ये लाँच झाला आहे. हा फोन Fog Blue, Autumn आणि Black कलरमध्ये विकत घेता येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here