Tecno च्या बजेट स्मार्टफोनची चर्चा गेले कित्येक दिवस सुरु होती. त्यानुसार कंपनीनं भारतात आपला नवीन बजेट फ्रेंडली स्मार्टफोन लाँच केला आहे. हा फोन Tecno Spark 9T नावानं दाखल झाला आहे. हा कंपनीच्या Spark 9 सीरीजचा दुसरा स्मार्टफोन आहे. हा फोन Spark 9 च्या तुलनेत अपग्रेडेड व्हर्जन असेल, जो भारतात काही आठवड्यांपूर्वी लाँच करण्यात आला आहे. Spark 9T स्मार्टफोनची डिजाइन Spark 9 सारखीच आहे. हा फोन ड्युअल टोन डिजाइनसह सादर करण्यात आहे. या फोनचा कॅमेरा मॉड्यूल गॉल्सी पॅनलसह सादर करण्यात आला आहे. फोनच्या बॅक पॅनलचा दुसरा भाग मॅट टेक्चर आणि वर्टिकल स्ट्रिप सह येतो. पुढे आम्ही तुम्हाला Tecno Spark 9T ची किंमत, स्पेसिफिकेशन्स आणि अन्य डिटेल्सची माहिती दिली आहे.
Tecno Spark 9T ची किंमत
Tecno Spark 9T स्मार्टफोनचा एकच स्टोरेज व्हेरिएंट कंपनीनं सादर एकल आहे. हा हँडसेटमध्ये 4GB RAM आणि 64GB स्टोरेज देण्यात आली आहे. या मॉडेलची किंमत भारतात 9,299 रुपये ठेवण्यात आली आहे. याची विक्री 6 ऑगस्टपासून ईकॉमर्स प्लॅटफॉर्म अॅमेझॉनवर सुरु होईल. हा फोन स्यान आणि ब्लू कलरमध्ये सादर केला गेला आहे.
Tecno Spark 9T चे स्पेसिफिकेशन्स
Tecno Spark 9T स्मार्टफोनमध्ये 6.6-इंचाचा Full HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 60Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. हा फोन 4G कनेक्टिव्हिटीसह येतो. प्रोसेसिंगसाठी कंपनीनं MediaTek चा Helio G35 चिपसेट दिला आहे. फोनमध्ये 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज मिळते. फोन 3GB व्हर्च्युअल रॅम फिचरसह सादर करण्यात आला आहे. त्यामुळे गरज पडल्यास तुम्ही एकूण 7GB RAM ची ताकद मिळवू शकता. फोनची स्टोरेज मायक्रोएसडी कार्डच्या मदतीनं 512GB पर्यंत वाढवता येते.
टेक्नोचा हा फोन Android 12 वर आधारित HiOS 7.6 वर चालतो. Tecno Spark 9T फोन ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह सादर करण्यात आला आहे. फोनचा प्रायमरी कॅमेरा 50MP रिजोल्यूशनसह सह येतो. या मुख्य कॅमेऱ्याच्या जोडीला कंपनीनं 2MP चा डेप्थ सेन्सर आणि 2MP चा मॅक्रो कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी Tecno Spark 9T स्मार्टफोनच्या फ्रंटला 8MP चा कॅमेरा मिळतो. Tecno च्या या फोनमध्ये 5,000mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 18W फास्ट चार्जिंग स्पीडनं चार्ज करता येते.
