Home बातम्या 8000 रुपयांपेक्षा कमी किंमती तीन कॅमेरे असलेला स्मार्टफोन; कॅमेरा, डिजाईन आणि फीचर्स मजबूत

8000 रुपयांपेक्षा कमी किंमती तीन कॅमेरे असलेला स्मार्टफोन; कॅमेरा, डिजाईन आणि फीचर्स मजबूत

Infinix कंपनीनं आपल्या किफायतशीर हँडसेटसाठी ओळखली जाते. कंपनीनं आता भारतात आपला नवीन बजेट फ्रेंडली स्मार्टफोन लाँच केला आहे. इनफिनिक्सचा हा फोन भारतात Infinix Smart 6 Plus नावानं दाखल झाला आहे. हा कंपनीच्या Smart 6 सीरीज मधील दुसरा मॉडेल आहे. ही सीरीज वर्षाच्या सुरुवातीला कंपनीनं सादर केली होती. Smart 6 Plus स्मार्टफोन ईकॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवरून विकत घेता येईल. या फोनच्या एकमेव व्हेरिएंटची किंमत 8000 रुपयांपेक्षा कमी ठेवली आहे. Smart 6 Plus स्मार्टफोनमध्ये पॉलीकार्बोनेट बॅक देण्यात आली आहे. तसेच कमी किंमतीत देखील यात मोठा डिस्प्ले आणि ड्युअल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. चला Infinix Smart 6 Plus ची किंमत, स्पेसिफिकेशन्स आणि फिचर्स जाणून घेऊया.

Infinix Smart 6 Plus चे स्पेसिफिकेशन्स

Infinix Smart 6 Plus मध्ये 6.82-इंचाचा + डिस्प्ले देण्यात आला आहे. यात सेल्फी कॅमेऱ्यासाठी वॉटरड्रॉप नॉच देण्यात आली आहे. हा डिस्प्ले 1600 x 720 पिक्सल रिजोल्यूशन, 440नीट्स ब्राईटनेस, 90.66 टक्के स्क्रीन टू बॉडी रेशियो, 72 टक्के NTSC कलर गमूट आणि पांडा MN228 ग्लासच्या सुरक्षेसह आला आहे. या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 60Hz आणि अस्पेक्ट रेश्यो 20.5:9 आहे. हे देखील वाचा: 10 हजारांच्या आत स्वस्त आणि मस्त स्मार्टफोन; 5000mAh बॅटरी, 50MP कॅमेऱ्यासह दमदार मोबाईलची एंट्री

सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 5MP चा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. Infinix Smart 6 Plus च्या मागे ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. ज्यात 8MP चा प्रायमरी कॅमेरा आणि एक डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. तसेच रियर कॅमेरा मॉड्यूलमध्ये LED फ्लॅश देखील आहे. इनफिनिक्स Smart 6 Plus स्मार्टफोनमध्ये रियर माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर मिळतो. तसेच फोन AI Face अनलॉकला देखील सपोर्ट करतो. हे देखील वाचा: छोटा पॅकेट बडा धमाका! 16GB रॅमसह दणकट ASUS Zenfone 9 लाँच; वनप्लस-शाओमीच्या अडचणी वाढल्या

इनफिनिक्सचा हा फोन MediaTek Helio G25 प्रोसेसरवर चालतो फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी आणि 10W चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. यात 3GB रॅम आणि 64GB स्टोरेज मिळते. यातील मेमरी microSD कार्ड स्लॉटच्या मदतीनं 512GB पर्यंत वाढवता येते. तर रॅम वाढवण्यासाठी 3GB पर्यंत व्हर्च्युअल रॅम सपोर्ट मिळतो. Infinix Smart 6 Plus स्मार्टफोन Android 12 (Go Edition) वर चालतो, जे अँड्रॉइडचं लाईट व्हर्जन आहे.

Infinix Smart 6 Plus ची किंमत

Infinix नं सिंगल स्टोरेज व्हेरिएंटसह Smart 6 Plus लाँच केला आहे. हा स्मार्टफोन 3GB रॅम आणि 64GB स्टोरेजला सपोर्ट करतो. भारतात याची किंमत 7,999 रुपये ठेवण्यात आली आहे. या फोनचा पहिला सेल 3 ऑगस्टला आयोजित करण्यात येईल. इनफिनिक्सचा हा फोन ब्लॅक आणि सी ब्लू कलरमध्ये सादर करण्यात आला आहे.