Home बातम्या सर्व टॉप फिचर स्वस्तात! 5000mAh बॅटरी आणि 50MP कॅमेऱ्यासह येतोय Redmi चा किफायतशीर फोन

सर्व टॉप फिचर स्वस्तात! 5000mAh बॅटरी आणि 50MP कॅमेऱ्यासह येतोय Redmi चा किफायतशीर फोन

Xiaomi च्या सब-ब्रँड Redmi अंतर्गत भारतात लवकरच नवीन बजेट स्मार्टफोन लाँच केला जाऊ शकतो. कंपनी बद्दल चर्चा आहे की लवकरच Redmi 11 Prime 5G स्मार्टफोन भारतात लाँच केला जाऊ शकतो. एका नवीन रिपोर्टनुसार, भारतात लाँच होणारा हा नवीन स्मार्टफोन अलीकडेच चीनमध्ये लाँच झालेल्या Redmi Note 11E 5G चा रिब्रँड व्हर्जन आहे. Redmi Note 11E 5G आणि POCO M4 5G स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्स मध्ये थोडाच फरक आहे. हा फोन काही दिवसांपूर्वी इंडोनेशियामध्ये Redmi 10 5G नावानं लाँच झाला आहे.

XiaomiUI च्या रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, Redmi 11 Prime 5G स्मार्टफोनचं कोडनेम ‘Light’ आणि मॉडेल नंबर 22041219I आहे. रेडमीचा हा फोन इंडोनेशियामध्ये लाँच झालेल्या Redmi 10 5G चा रिब्रँड व्हर्जन असू शकतो. रेडमीचा हा फोन चीनमध्ये Note 11E 5G नावानं सादर करण्यात आला आहे. पुढे आम्ही तुम्हाला आगामी Redmi 11 Prime 5G स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्स, फीचर् आणि अन्य माहिती दिली आहे.

Redmi 11 Prime 5G इंडिया लाँच

Redmi 11 Prime 5G स्मार्टफोन लवकरच भारतात एंट्री करू शकतो. शाओमीच्या या फोनच्या लाँच बद्दल सध्या तरी कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध झाली नाही. XiaomiUI च्या रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की आगामी Redmi 11 Prime 5G स्मार्टफोन इंडोनेशियामध्ये लाँच करण्यात आलेल्या Redmi 10 5G सारखा असू शकतो.

भारतात लाँच होणाऱ्या Redmi 11 Prime 5G स्मार्टफोनमध्ये 6.58-इंचाचा IPS LCD डिस्प्ले दिला जाईल, ज्याचे रिजोल्यूशन Full HD+ आणि रिफ्रेश रेट 90Hz असू शकतो. तसेच हा फोन MediaTek Dimensity 700 SoC सह सादर केला जाऊ शकतो. या फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप दिला जाईल, ज्याचा प्रायमरी कॅमेरा 50MP चा असेल, तसेच 2MP चा सेकंडरी कॅमेरा दिला जाईल. रेडमीच्या या फोनमध्ये इन डिस्प्ले फिंगर प्रिंट स्कॅनर आणि एआय फेस अनलॉक मिळेल.

रेडमीचा आगामी 11 Prime 5G स्मार्टफोन अँड्रॉइड 12 वर आधारित MIUI 13 वर चालेल. या फोनमध्ये 5000 mAh ची बॅटरी आणि 18W फास्ट चार्जिंग सपोर्टसह मिळेल. फोनमध्ये सेल्फीसाठी 5MP चा सेल्फी कॅमेरा दिला जाऊ शकतो. रेडमी 11 प्राइम 5G स्मार्टफन भारतात 12000 रुपयांपर्यंतच्या किंमतीत लाँच केला जाऊ शकतो. सध्या या फोनबद्दल एवढीच माहिती उपलब्ध आहे.