Home बातम्या लो बजेटमध्ये लाॅन्च झाला Vivo Y02A; स्टाईलिश लुकसह मिळेल 5,000mAh Battery

लो बजेटमध्ये लाॅन्च झाला Vivo Y02A; स्टाईलिश लुकसह मिळेल 5,000mAh Battery

Highlights
  • Vivo Y02A स्मार्टफोन बांग्लादेशात लाॅन्च झाला आहे.
  • हा फोन MediaTek Helio P35 वर चालतो.
  • याचे स्पेसिफिकेशन्स भारतातील Vivo Y02 सारखे आहेत.

Vivo Y02A स्मार्टफोन भारताच्या शेजारच्या देशात म्हणजे बांग्लादेशात लाॅन्च झाला आहे. कंपनीनं गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये Vivo Y02 भारतीय बाजारात आणला होता आणि आता या फोनचा दुसरा व्हर्जन बांग्लादेशात वाय02ए नावानं सादर झाला आहे. हा एक लो बजेट डिवायस आहे ज्यात 3GB RAM, MediaTek Helio P35 प्रोसेसर आणि 5,000mAh Battery सारखे स्पेसिफिकेशन्स मिळतात. पुढे आम्ही या नवीन विवो फोनची संपूर्ण माहिती दिली आहे.

विवो वाय02ए ची किंमत

Vivo Y02A बांग्लादेशात सिंगल मेमरी व्हेरिएंटमध्ये आला आहे. हा फोन 3जीबी रॅमसह 32जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो ज्याची किंमत BDT 12,499 म्हणजे भारतीय करंसीनुसार 9,600 रुपयांच्या आसपास आहे. विवोनं आपला हा फोन Orchid Blue आणि Cosmic Grey कलर व्हेरिएंटमध्ये सादर केला आहे जो सध्या बांग्लादेशातच सेलसाठी उपलब्ध होईल.

विवो वाय02ए चे स्पेसिफिकेशन्स

Vivo Y02A चे फीचर्स व स्पेसिफिकेशन्स पाहता हा मोबाइल फोन 1600 × 720 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.51 इंचाच्या मोठ्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. हा फोन स्क्रीन आयपीएस एलसीडी पॅनलवर बनला आहे जो 60हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करतो. डिस्प्लेच्या वरच्या बाजूला ‘यू’ शेप वाॅटरड्राॅप नाॅच देण्यात आली आहे. स्क्रीनच्या तीन कडा बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला मोठा चिन पार्ट आहे.

विवो वाय02ए अँड्रॉइड 12 गो एडिशनवर लाॅन्च झाला आहे जो फनटच ओएस 12 वर चालतो. प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये मीडियाटेक हीलियो पी35 ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. बांग्लादेशात हा फोन 3जीबी रॅमसह लाॅन्च करण्यात आला आहे जो 32 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. अँड्रॉइड गो असल्यामुळे या फोनमध्ये कमी रॅमवर देखील स्मूद चालणारे गुगल गो अ‍ॅप्स डाउनलोड व इन्स्टाल करता येतात.

फोटोग्राफीसाठी Vivo Y02A च्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह एफ/2.0 अपर्चर असलेला 8 मेगापिक्सलचा सिंगल रियर कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे तसेच सेल्फी आणि व्हिडीओ काॅलिंगसाठी हा फोन एफ/2.2 अपर्चर असलेल्या 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी हा फोन 5,000एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो जी 10वाॅट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येते. या विवो फोनचे डायमेंशन 163.99 × 75.63 × 8.49एमएम आणि वजन 186ग्राम आहे.