Home बातम्या Samsung ची मोठी भेट, पुन्हा कमी केली 5000mAh बॅटरी असलेल्या Galaxy A21s ची किंमत, जाणून घ्या नवीन प्राइस

Samsung ची मोठी भेट, पुन्हा कमी केली 5000mAh बॅटरी असलेल्या Galaxy A21s ची किंमत, जाणून घ्या नवीन प्राइस

सॅमसंग गॅलेक्सी ए21एस ची किंमत पुन्हा एकदा कमी करण्यात आली आहे. दक्षिण कोरियन कंपनीने गेल्या महिन्यात Samsung Galaxy A21s च्या दोन्ही वेरियंटच्या किंमतीत कपात केली होती. पण आता पुन्हा एकदा ग्राहकांना भेट देत कंपनीने हँडसेटच्या किंमती कमी केल्या आहेत. 91मोबाईल्सला फोनची किंमत कमी झाल्याची माहिती ऑफलाइन रिटेल स्टोर्स कडून मिळाली आहे. तसेच कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावर पण फोन कमी किंमतीत विकला जात आहे.

नवीन किंमत

सॅमसंग गॅलेक्सी ए21एस चा 6 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज वेरिएंट 18,499 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला होता. पण गेल्या महिन्यातील कपातीनंतर या फोनचा हा वेरिएंट 17,499 रुपयांमध्ये विकला जात होता. आता पुन्हा एकदा किंमत केल्यामुळे डिवाइसचा टॉप-एन्ड वेरिएंट 16,499 रुपयांमध्ये विकला जात आहे. तसेच फोनचा 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज वेरिएंट 14,999 रुपयांमध्ये विकला जात आहे. हा वेरिएंट कंपनीने 16,999 रुपयांमध्ये सादर केला होता. हा फोन ब्लॅक, ब्लू आणि व्हाईट रंगात अमेझॉन इंडिया आणि Samsung India च्या साइट आणि ऑफलाइन रिटेल स्टोर्स वर नवीन किंमतीत विकत घेता येईल.

बॅटरी आहे खास

सॅमसंग गेले अनेक दिवस मोठी बॅटरी असलेले फोन्स सादर करून ग्राहकांना आकर्षित करत आहे. असेच काहीसे कंपनीने गॅलेक्सी ए21एस द्वारे केले होते. यूजर्सना Galaxy A21s मध्ये 15 वॉट फास्ट चार्जिंग सह 5,000 एमएएच ची बॅटरी मिळाली आहे. कंपनीने स्मार्टफोन मध्ये कनेक्टिविटीसाठी वाई-फाई, ब्लूटूथ, जीपीएस, 3.5 एमएम हेडफोन जॅक आणि यूएसबी पोर्ट टाइप-सी सारखे फीचर्स दिले आहेत.

पावरफुल कॅमेरा

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Samsung Galaxy A21s क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एफ/2.0 अपर्चर असलेला 48 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. तसेच फोनच्या बॅक पॅनल वर एफ/2.2 अपर्चर असलेली 8 मेगापिक्सलची अल्ट्रावाइड अँगल लेंस, एफ/2.4 अपर्चर असलेली 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आणि तेवढाच अपर्चर असलेला 2 मेगापिक्सल डेफ्थ सेंसर आहे. सेल्फी व वीडियो कॉलिंगसाठी हा फोन एफ/2.2 अपर्चर असलेल्या 13 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy A21s चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स सांगायचे झाले तर हा फोन 1600 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या एचडी+ टीएफटी डिस्प्ले वर लॉन्च केला गेला आहे. गॅलेक्सी ए21एस एंडरॉयडच्या लेटेस्ट ओएस एंडरॉयड 10 सह सॅमसंग वनयूआई वर चालतो. भारतात हा फोन सॅमसंगच्या एक्सनॉस 850 चिपसेट वर लॉन्च झाला आहे.

भारतात फोन दोन वेरिएंट्स मध्ये सादर केला गेला आहे. Samsung Galaxy A21s च्या बेस वेरिएंट मध्ये 4 जीबी रॅम सह 64 जीबी की इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे तर दुसरा वेरिएंट 6 जीबी रॅम सह 64 जीबी इंटरनल स्टोरेज सह येतो. दोन्ही वेरिएंट्स मध्ये कार्डने स्टोरेज 512 जीबी पर्यंत वाढवता येते.

सॅमसंग गॅलेक्सी ए21एस वीडियो