Home बातम्या दमदार बॅटरी असलेल्या POCO C31 वर 4,000 रुपयांची सुट; 512GB पर्यंत मेमरीकार्ड सपोर्ट

दमदार बॅटरी असलेल्या POCO C31 वर 4,000 रुपयांची सुट; 512GB पर्यंत मेमरीकार्ड सपोर्ट

POCO नं आपल्या किफायतीशीर स्मार्टफोन POCO C31 आणखी स्वस्त केला आहे. कंपनीचा हा मोबाईल ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Flipkart वर खूप कमी किंमतीत विकला जात आहे. POCO C31 मोबाईलवर कंपनी 4,000 रुपयांचा दमदार डिस्काउंट ऑफर करत आहे. तसेच ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्मवर Poco च्या या डिवाइसवर अजून देखील अनेक शानदार ऑफर्स सुरु आहेत. त्यामुले हा डिवाइस खूप कमी किंमतीत विकत घेता येईल. फीचर्स पाहता, POCO C31 मध्ये दमदार MediaTek Helio G35 प्रोसेसर, 6.53 इंचाचा मोठा डिस्प्ले, 5000mAh बॅटरी, ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह अनेक फीचर्स मिळतात.

POCO C31 वरील ऑफर

कंपनीनं POCO C31 फोन 11,999 रुपयांमध्ये लाँच केला होता. परंतु Flipkart वर सध्या डिवाइसवर 33 टक्के म्हणजे 4,000 रुपयांचा डिस्काउंट ऑफर दिला जात आहे. या ऑफर अंतर्गत युजर्स POCO C31 फोन फक्त 7,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. ही किंमत फोनच्या 4GB रॅम + 64GB स्टोरेज व्हेरिएंटची आहे. तसेच हा फोन EMI च्या माध्यमातून देखील विकत घेता येईल. फोन Flipkart Axis Bank Card नं विकत घेतल्यास 5 टक्के कॅशबॅक दिला जात आहे. इतकेच नव्हे तर फोन घेतल्यास 3 महिन्यांचे Gaana Plus Subscription देखील मिळू शकतं. एक्सचेंज ऑफर्स पाहता, कंपनी या स्मार्टफोनवर 7,250 रुपयांपर्यंतचा बोनस देखील मिळत आहेत. म्हणजे जर तुमच्या जुन्या फोनची कंडीशन चांगली असेल तर तुम्ही हा फोन खूप कमी किंमतीत विकत घेता येईल. हे देखील वाचा: Electric Car सेगमेंटमध्ये धुमाकूळ घालण्यासाठी येतेय Xiaomi; स्वस्तात मिळणार ‘ऑटोमॅटिक’ चालणारी कार

POCO C31 चे फीचर्स

फोनमध्ये 6.53 इंचाचा HD+ एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. जो 720×1,600 पिक्सल रेजोल्यूशनला सपोर्ट करतो, डिस्प्लेवर वॉटरड्रॉप नॉच डिजाइन देण्यात आली आहे. फोन टीयूवी रीनलँड लो ब्लू लाईट सर्टिफिकेशनसह येतो. प्रोसेसर पाहता यात MediaTek Helio G35 चिपसेटचा वापर करण्यात आला आहे. यात 4GB पर्यंत रॅम आणि 64GB पर्यंत इंटरनल स्टोरेज मिळते. स्टोरेज मायक्रोएसडी कार्ड स्लॉटच्या मदतीनं 512GB पर्यंत वाढवता येईल.

Poco C31 मध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात 13MP प्रायमरी लेन्स आणि दोन 2MP चे अन्य सेन्सर देण्यात आले आहेत. हा कॅमेरा फेस डिटेक्शन ऑटोफोकस, एचडीआर, एआय पोर्ट्रेट मोड, फेस रिकग्निशन, एआय सीन डिटेक्शन आणि नाईट मोड सारखे फीचर मिळतात. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 5MP चा फ्रंट कॅमेरा आहे. हे देखील वाचा: वजनाने हलका, फीचर्सनी शक्तिशाली! पूर्ण झाली Xiaomi 12 Lite च्या लाँचची तयारी

कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये ड्युअल VoLTE आणि VoWiFi, 3.5mm ऑडियो जॅक, Wi-Fi 802.11 b/g/n, ब्लूटूथ v5 आणि मायक्रो USB पोर्ट सारखे ऑप्शन मिळतात. तसेच फोनमध्ये रियर-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉकची सुरक्षा मिळते. फोनमध्ये दीर्घकाळ चालणारी 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.