Home बातम्या 64MP कॅमेरा, 8GB रॅम असलेल्या Redmi 50i फोनवर बंपर डिस्काउंट, अशी आहे ऑफर

64MP कॅमेरा, 8GB रॅम असलेल्या Redmi 50i फोनवर बंपर डिस्काउंट, अशी आहे ऑफर

Redmi नं गेल्याच महिन्यात भारतात आपला लेटेस्ट Redmi K50i स्मार्टफोन लाँच केला होता. Redmi K50i स्मार्टफोनवर सध्या ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म Amazon India वर जबरदस्त डिस्काउंट मिळत आहे. फोनवर सध्या 4500 रुपयांची सूट दिली जात आहे. त्यामुळे जर तुम्हाला देखील प्रीमिमय मिड रेंज सेगमेंटमध्ये एक दणकट स्मार्टफोन हवा असेल तर तुम्ही याचा विचार करू शकता. आज आम्ही तुम्हाला लेटेस्ट Redmi K50i स्मार्टफोनवर मिळणाऱ्या डिस्काउंटची बाबत माहिती देत आहोत. तसेच पुढे आम्ही तुम्हाला रेडमीच्या या फोनच्या सर्व फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सची देखील माहिती दिली आहे.

Redmi K50i ऑफर

Redmi K50i स्मार्टफोनवर अ‍ॅमेझॉन इंडियाच्या वेबसाईटवर 1500 रुपयांचा कुपन डिस्काउंट मिळत आहे. तसेच ICICI बँक आणि SBI च्या क्रेडिट कार्डवर 3000 रुपयांचा इंस्टंट डिस्काउंट दिला जात आहे. अशाप्रकारे रेडमीच्या या फोनवर एकूण 4500 रुपयांची सवलत दिली जात आहे. त्यामुळे रेडमीचा हा फोन 25,999 रुपयांच्या ऐवजी ऑफरसह 21,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

रेडमी के50आय स्मार्टफोनचे भारतात दोन व्हेरिएंट आले आहेत. या फोनचा पहिला व्हेरिएंट 6GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह 25,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तर 8GB रॅम व 256GB स्टोरेज ऑप्शनसाठी 28,999 रुपये मोजावे लागतील. वरील ऑफर ऑफर या दोन्ही व्हेरिएंटवर उपलब्ध आहे.

Redmi K50i चे स्पेसिफिकेशन्स

Redmi K50i 5G स्मार्टफोनमध्ये 6.6-इंचाचा Full-HD+ LCD पॅनल देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 144Hz आणि टच सॅम्पलिंग रेट 270Hz आहे. हा डिस्प्ले Dolby Vision, 650 निट्स ब्राईटनेस आणि HDR10+ ला सपोर्ट करतो. कंपनीनं डिस्प्लेला Corning Gorilla Glass 5 ची सुरक्षा दिली आहे. कनेक्टिव्हिटी फोनमध्ये 3.5mm हेडफोन जॅक, साईड माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर, IR ब्लास्टर, ड्युअल स्टीरियो स्पिकर, Dolby Atoms, आणि लिक्विड कूलिंग 2.0 टेक्नॉलॉजी देण्यात आला आहे.

हा फोन Android 12 आधारित MIUI वर चालतो. फोनमध्ये MediaTek Dimensity 8100 चिपसेटची प्रोसेसिंग पावर मिळते. सोबतीला 8GB LPDDR5 RAM आणि 256GB UFS 3.1 स्टोरेज देण्यात आली आहे. फोनमध्ये स्टोरेजसाठी मायक्रोएसडी कार्ड स्लॉट देण्यात आला आहे.

फोटोग्राफीसाठी Redmi K50i 5G स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. ज्यात 64MP चा प्रायमरी कॅमेरा आहे जो Samsung GW1 सेन्सर आहे. प्रायमरी कॅमेरा सेन्सरसह 8MP चा अल्ट्रा-वाईड कॅमेरा आणि 2MP चा मॅक्रो कॅमेरा मिळतो. रेडमीच्या या फोनमध्ये सेल्फीसाठी 8MP चा फ्रंट कॅमेरा आहे. यातील 5,080mAh ची बॅटरी 67W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.