Home बातम्या 8GB RAM आणि 80W Charging सह लाँच झाला नवीन Vivo Phone, मिळेल 50MP Camera

8GB RAM आणि 80W Charging सह लाँच झाला नवीन Vivo Phone, मिळेल 50MP Camera

Vivo V30 Lite स्मार्टफोनचे एक नवीन मॉडेल जागतिक मार्केटमध्ये लाँच झाले आहे. हा मोबाईल चिपसेटसह आला आहे जो रशियन बाजारात विकले जाईल. नवीन विवो वी 30 लाईट स्मार्टफोन मॅक्सिको व यूएईमध्ये विकले जात असलेल्या फोन मॉडेल पेक्षा वेगळा आहे. नवीन V30 Lite चे फिचर्स व स्पेसिफिकेशनची माहिती तुम्ही पुढे वाचू शकता.

Vivo V30 Lite चे स्पेसिफिकेशन

स्क्रीन : विवो वी30 लाईट फोन 2400 x 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.67 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेवर लाँच झाला आहे. पंच-होल स्टाईल असणारी ही स्क्रीन अ‍ॅमोलेड पॅनलवर बनली आहे जी 120 हर्ट्झ रिफ्रेश रेट, 1200 हर्ट्झ टच सॅम्पलिंग रेट तसेच 1200 निट्स ब्राइटनेसला सपोर्ट करते.

प्रोसेसर : नवीन Vivo V30 Lite स्मार्टफोन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 685 ऑक्टाकोर प्रोसेसरवर लाँच झाला आहे. ही 6 नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेली चिपसेट आहे जी 2.8 गीगाहर्ट्झ पर्यंतच्या क्लॉक स्पीडवर चालते.

मेमरी : विवो वी 30 लाईट 8 जीबी रॅम मेमरीसह मार्केटमध्ये आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 8 जीबी वचुर्अल रॅम देण्यात आली आहे जी 8 जीबी फिजिकल रॅमसह मिळून याला 16 जीबी रॅमची पावर देते. हा मोबाईल 1 टीबी मायक्रोएसडी कार्डला सपोर्ट करतो.

कॅमेरा : फोटोग्राफीसाठी Vivo V30 Lite 4G ड्युअल रिअर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. याच्या बॅक पॅनलवर एफ/1.8 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सल मेन कॅमेरा देण्यात आला आहे जो 2 मेगापिक्सल सेकंडरी सेन्सरसह चालतो. तसेच सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी यात 8 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा मिळतो.

बॅटरी : पावर बॅकअपसाठी विवो वी 30 लाईट स्मार्टफोन 5,000 एमएएच बॅटरीला सपोर्ट करतो. तसेच ही मोठी बॅटरी फास्ट चार्ज करण्यासाठी स्मार्टफोनला 80 वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे.