Honor चा बहुचर्चित फ्लिप स्मार्टफोन Honor Magic V Flip आज 13 जून रोजी चीनच्या होम मार्केटमध्ये दाखल होत आहे. त्याचवेळी लाँच करण्यापूर्वी या डिव्हाईसचे गीकबेंच साईटवर दिसले आहे. ज्यामध्ये चिपसेट आणि स्टोरेजसह इतर तपशील समोर आले आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो की, डिव्हाईसचे डिझाईन आणि काही फिचर्स कंपनीच्या वेबसाईटवर आधीच शेअर केले आहेत. चला आपण पुढे याची नवीन बेंचमार्किंग माहिती आणि इतर स्पेसिफिकेशनची माहिती तपशीलवार जाणून घेऊया.
Honor Magic V Flip गीकबेंच सूची
- Honor Magic V Flip हे मॉडेल क्रमांक LRA-AN00 सह गीकबेंच सर्टिफिकेशन वेबसाईटवर दिसले आहे.
- मोबाईलने सिंगल-कोर राऊंडमध्ये 1,732 आणि मल्टी-कोर राऊंडमध्ये 4,431 गुण मिळवले आहेत.
- सूचीनुसार, सूचीनुसार, या डिव्हाईसमध्ये SM8475 हा कोडनेम क्वालकॉम चिपसेट आहे, जो 3.0 गिगाहर्ट्झ सीपीयू सह क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8+ जेन 1 चिपसेट असू शकतो. यासोबत ॲड्रेनो 730 जीपीयू मॅजिक व्ही फ्लिपमध्ये जोडला जाईल.
- गीकबेंच प्लॅटफॉर्मनुसार, हा नवीन फ्लिप फोन 12 जीबी रॅमसह आणला जाऊ शकतो.
- ऑपरेटिंग सिस्टमबद्दल बोलायचे झाल्यास, तर हा स्मार्टफोन Android 14 वर आधारित असल्याचे सांगितले जात आहे.
Honor Magic V Flip डिझाईन
- Honor Magic V Flip मध्ये मोठा कव्हर डिस्प्ले आहे. वरच्या कोपऱ्यात f/1.9 अपर्चर आणि आयओएस सपोर्टसह 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे.
- प्रायमरी लेन्सच्या खाली एक छोटा दुसरा कॅमेरा दिला गेला आहे. तसेच या फोनमध्ये एलईडी फ्लॅश तळाशी देण्यात आला आहे.
- मॅजिक व्ही फ्लिपच्या उजव्या कोपऱ्यात व्हॉल्यूम रॉकर आणि पॉवर बटण आहे. तर खालच्या बाजूस तुम्हाला एक सिम स्लॉट, यूएसबी-सी पोर्ट आणि स्पीकर ग्रिल मिळेल.
Honor Magic V Flip स्पेसिफिकेशन
- Honor Magic V Flip चे आणखी स्पेसिफिकेशन अजून समोर आलेले नाहीत. पण या डिवाईसमध्ये 4500 एमएएच ड्युअल सेल बॅटरी दिली जाऊ शकते. ही बॅटरी चार्ज करण्यासाठी 66 वॅट फास्ट चार्जिंग सपोर्ट असू शकतो.
- हा Honor फोन 12GB रॅम + 256GB स्टोरेज, 12GB रॅम + 512 जीबी स्टोरेज आणि 12GB रॅम + 1 टीबी स्टोरेज अशा तीन प्रकारांमध्ये आणला जाऊ शकतो.
- या मोबाईलच्या फोटोमध्ये असे दिसून आले आहे की, यात मोठा कव्हर असलेला डिस्प्ले असू शकतो. परंतू, या डिस्प्लेच्या आकाराबाबत अधिक तपशील येणे बाकी आहे.
- Honor Magic V Flip मध्ये 50 मेगापिक्सेलची प्राथमिक कॅमेरा लेन्स असेल, जी ऑप्टिकल फोटो स्टॅबिलायझेशनला सपोर्ट करेल.
