विवो टी2 सीरीजसंबंधित बातम्या गेल्या कित्येक दिवस येत होत्या. कंपनी देखील हे फोन्स टीज करत होती आता विवोनं आपला नवीन मोबाइल फोन Vivo T2 5G ऑफिशियल केला आहे. जोडीला कंपनीनं Vivo T2x देखील सादर केला आहे. हा विवो फोन शानदार कॅमेऱ्यासह आला आहे तसेच फीचर्स व अन्य स्पेसिफिकेशन्सची माहिती तुम्ही पुढे वाचू शकता.
विवो टी2 5जी चे स्पेसिफिकेशन्स
- 6.38” AMOLED Display
- Snapdragon 695
- 64MP Dual Rear Camera
- Android 13
- 4500mAh Battery, 44W Fast Charging
Vivo T2 5G स्मार्टफोन वॉटरड्रॉप स्टाईल स्क्रीनसह लाँच झाला आहे. या फोनमध्ये 6.38 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. ही स्क्रीन अॅमोलेड पॅनलवर बनली आहे जी फुल एचडी+ रिजोल्यूशनला सपोर्ट करते. विवो टी2 5जी स्नॅपड्रॅगन 695 प्रोसेसरवर चालतो. या फोनमध्ये अँड्रॉइड 13 सह फनटच ओएस देण्यात आला आहे. फोनमध्ये 8जीबी पर्यंत रॅम आणि 128जीबी स्टोरेज देण्यात आली आहे.
Vivo T2 5G फोटोग्राफीसाठी ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. या फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 64 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे, जो एफ 1.79 अपर्चरला सपोर्ट करतो. तर जोडीला एफ 2.4 अपर्चरसह 2 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी एफ 2.0 अपर्चर असलेला 16 मेगापिक्सलचा सेन्सर आहे.
विवो टी2 5जी मध्ये पावर बॅकअपसाठी 4,500एमएएचची मोठी बॅटरी देण्यात आली आहे, जी 44W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कनेक्टव्हिटीसाठी यात 2जी, 3जी, 4जी, 5जीसह Wi-Fi, Bluetooth, USB, GPS आणि OTG सपोर्ट देखील मिळतो. या एक ड्युअल सिम फोन आहे, जो मायक्रोएसडी कार्डला देखील सपोर्ट करतो. सिक्योरिटीसाठी हा फोन इनडिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरला सपोर्ट करतो.
विवो टी2 5जी ची किंमत
Vivo T2 5G चे भारतात दोन व्हेरिएंट्स आले आहेत. एकामध्ये 6GB रॅम आहे तर दुसऱ्यामध्ये 8GB रॅम परंतु दोन्ही मॉडेल्समध्ये 128GB स्टोरेज मिळते. बेस मॉडेलची किंमत 18,999 रुपये तर मोठ्या मॉडेलची किंमत 20,999 रुपये ठेवण्यात आली आहे. या फोनची विक्री 18 एप्रिलपासून फ्लिपकार्टसह विवोची वेबसाइट आणि ऑफलाइन स्टोर्सच्या माध्यमातून केली जाईल. विवो टी2 5जी Velocity Wave आणि Nitro Blaze कलरमध्ये लाँच करण्यात आला आहे.
