ई-कॉमर्स वेबसाईट Flipkart वर सध्या Big Saving Day Sale सुरु आहे जो म्हणजे 27 जुलैला संपेल. दरम्यान या ई-कॉमर्स वेबसाईटवर अनेक प्रोडक्ट्स स्वस्तात विकत घेता येत आहेत. इतकेच नव्हे तर या सेलमध्ये शानदार डिस्प्ले असलेला स्मार्ट टीव्ही देखी कमी किंमतीत विकला जात आहे. त्यामुळे जर तुम्ही एक नवीन टीव्ही विकत घेण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही तुम्हाला या सेलमध्ये मिळणाऱ्या काही शानदार स्मार्ट टीव्ही डील्स बाबत सांगणार आहोत ज्यात तुम्ही खूप स्वस्तात स्मार्ट टीव्ही (Smart Tv Sale) विकत घेऊ शकता. इतकेच नव्हे तर या सेलमध्ये एक मोठी स्क्रीन असलेला टीव्ही देखील फक्त 6,999 रुपयांमध्ये विकत घेऊ शकता. चला जाणून घेऊया.
स्वस्तात विकत घ्या शानदार टीव्ही
सेलमध्ये दरम्यान THOMSON Smart Tv मॉडेल्स खूप स्वस्तात विकले जात आहेत. फ्लिपकार्ट सेलमध्ये कंपनीचे स्मार्ट टीव्ही मॉडेल्स डिस्काउंटसह विकले जात आहेत, तसेच ग्राहकांना या मॉडेल्सच्या खरेदीवर अतिरिक्त सवलत देखील मिळत आहे. तसेच Blaupunkt च्या शानदार टीव्हीवर देखील भरपूर डिस्काउंट दिला जात आहे.
6999 रुपयांमध्ये मिळतोय LED TV
थॉमसन आपला सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या प्रोडक्ट पैकी एक 24 इंचाचा टीव्ही (24TM2490) फक्त 6,999 रुपयांमध्ये विकला जात आहे. हा एक एलईडी टीव्ही आहे, स्मार्ट टीव्ही नव्हे. या व्यतिरिक्त मॉडेल नंबर 32PATH011 फ्लिपकार्टवर 10,999 रुपये, मॉडेल नंबर 42 PATH 2121 ची विक्री 18,999 रुपये आणि मॉडेल नंबर 55 OATH PRO 0101 फक्त 34,999 रुपयांमध्ये विकला जात आहे.
Blaupunkt TV वर देखील मिळतोय मोठा डिस्काउंट
याव्यतिरिक्त फ्लिपकार्टवर Blaupunkt सायबर साउंड 32-इंचाचा टीव्ही 11,999 रुपयांमध्ये विकला जात आहे. हा HD-रेडी डिस्प्लेसह येतो. यात 40W स्पिकर आउटपुट सपोर्ट असलेले 2 स्पिकर देण्यात आले आहेत. तसेच कंपनीचा दुसरा हीरो मॉडेल, 42-इंच फुल-एचडी (1,920×1080 पिक्सल) फक्त 17,999 रुपयांमध्ये विकला जात आहे. यात Android 9, अल्ट्रा-थिन बेजल, 1GB रॅम, 8GB ROM, शानदार सराउंड साउंड सर्टिफिकेशन ऑडियो आणि 40W स्पिकर आउटपुटसह 2 स्पिकर आहेत.
इतकेच नव्हे तर सेलमध्ये कंपनीचा 43-इंचाचा अल्ट्रा-एचडी (3,840×2, 160 पिक्सल) मॉडेल 26,999 रुपये, 50-इंच अल्ट्रा-एचडी (3840×2160 पिक्सल) टीव्ही 31,999 रुपये आणि बेजल-लेस 55-इंचाचा अल्ट्रा-एचडी (3840×2160 पिक्सल) टीव्ही 37,999 रुपयांमध्ये विकला जात आहे.
तसेच 54,999 रुपयांमध्ये 65-इंचाचाचा अल्ट्रा-एचडी लेटेस्ट Android 10 वर करणार टीव्ही विकला जात आहे. यात डॉल्बी एमएस 12 साउंड टेक्नॉलॉजीसह 60W स्पिकर आउटपुट मिळतो जो डॉल्बी अॅटमॉस सपोर्ट देण्यात आला आहे.
