Home बातम्या 6999 रुपयांमध्ये आला Redmi A3x स्मार्टफोन, जाणून घ्या या स्वस्त मोबाईलचे फिचर्स आणि स्पेसिफिकेशन

6999 रुपयांमध्ये आला Redmi A3x स्मार्टफोन, जाणून घ्या या स्वस्त मोबाईलचे फिचर्स आणि स्पेसिफिकेशन

91Mobiles ने गेल्या आठवड्यात वाचकांना माहिती दिली होती की, स्वस्त मोबाईल फोन Redmi A3X ची भारतीय ऑफलाईन बाजारात विक्री सुरू झाली आहे. तर नवीन Redmi A3x आजपासून ऑनलाईन शॉपिंग साईट्सवर देखील उपलब्ध झाला आहे. हा कमी बजेट स्मार्टफोन फक्त 6,999 रुपयांना खरेदी करता येईल. तुम्ही Redmi A3X किंमत, फिचर्स आणि स्पेसिफिकेशनची माहिती पुढे वाचू शकता.

Redmi A3x चे दर

Redmi A3X स्मार्टफोन 3GB रॅम सह लाँच करण्यात आला आहे, जो 64GB स्टोरेजला सपोर्ट करतो. Redmi A3x ची किंमत 6,999 रुपये आहे. हा स्वस्त स्मार्टफोन अरोरा ग्रीन, मिडनाईट ब्लॅक आणि मूनलाईट व्हाईट रंगांमध्ये खरेदी करता येईल. फोनची विक्री ऑफलाईन रिटेल स्टोअर्स तसेच ई-कॉमर्स साईट ॲमेझॉनवर सुरू झाली आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की, ही बातमी लिहिपर्यंत रेडमीच्या अधिकृत वेबसाईटवर फोनचे पेज लाईव्ह गेले नव्हते. पण Redmi A3X चे सर्व तपशील ॲमेझॉनवर उपलब्ध आहेत.

Redmi A3x डिझाईन

Redmi A3x चे स्पेसिफिकेशन

डिस्प्ले: Redmi A3x स्मार्टफोन 720 x 1650 पिक्सेल रिझोल्यूशन असलेल्या 6.71 इंचाच्या HD+ वॉटरड्रॉप नॉच स्क्रिनवर लाँच करण्यात आला आहे. हा एक आयपीएस एलसीडी डिस्प्ले आहे, जो 90Hz रिफ्रेश रेट आणि 500nits ब्राईटनेसला सपोर्ट करतो. फोनच्या स्क्रीनला गोरिल्ला ग्लास 3 ने संरक्षित करण्यात आले आहे.

प्रोसेसर: Redmi A3X अँड्रॉईड 14 वर लाँच झाला आहे. प्रोसेसिंगसाठी या फोनला Unisoc T603 ऑक्टा-कोर प्रोसेसर देण्यात आला आहे. जो 1.8GHz क्लॉक स्पीडने रन करण्याची क्षमता ठेवतो.

मेमरी: Redmi A3x भारतीय बाजारपेठेत सिंगल मेमरी व्हेरियंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. हा मोबाईल 3GB रॅमला सपोर्ट करतो ज्यात 64GB इंटरनल स्टोरेज दिलेले आहे. फोनमध्ये मेमरी कार्ड देखील बसवले जाऊ शकते.

कॅमेरा: Redmi A3X स्मार्टफोनच्या बॅक पॅनलवर फोटोग्राफीसाठी 8 मेगापिक्सेल AI ड्युअल कॅमेरा सिस्टम देण्यात आली आहे. तर हा मोबाईल फोन सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 5MP फ्रंट कॅमेराला सपोर्ट करतो.

बॅटरी: पॉवर बॅकअपसाठी Redmi 3X मध्ये मोठी 5000mAh ची बॅटरी दिली गेली आहे. या मोबाईलमध्ये यूएसबी टाईप सी पोर्ट आहे. ज्यासोबत 10W चार्जिंग स्पीड देखील उपलब्ध आहे.

इतर वैशिष्ट्ये: सुरक्षेसाठी यात फिजिकल फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक यांसारखे फिचर्स उपलब्ध आहेत. हा मोबाईल 3.5mm हेडफोन जॅकलाही सपोर्ट करतो. त्याची जाडी 8.3 मिमी आणि वजन 193 ग्रॅम आहे.

Redmi A3x च्या बजेटमधील इतर फोन

काही दिवसांपूर्वीच, Realme C61 हा 7,699 रुपयांना लाँच करण्यात आला होता, ज्यामध्ये 4GB रॅम मिळते. हा मोबाईल Redmi A3X समोर एक चांगला पर्याय बनू शकतो. याशिवाय, 7,999 रुपये किमतीचा LAVA O2 स्मार्टफोन आणि 6999 रुपये किमतीचा Moto G04s देखील Redmi A3x च्या समोर चांगले पर्याय बनू शकतात.