Home बातम्या 9 हजार रुपयांच्या रेंजमध्ये लाँच झाला Vivo Y36t, यात आहे 50MP Camera, 5000mAh Battery आणि 6GB RAM

9 हजार रुपयांच्या रेंजमध्ये लाँच झाला Vivo Y36t, यात आहे 50MP Camera, 5000mAh Battery आणि 6GB RAM

विवोने आपल्या होम मार्केट चीनमध्ये ‘वाय’ सीरिजचा विस्तार करत नवीन स्मार्टफोन Vivo Y36t लाँच केला आहे. हा एक 4G फोन आहे जो MediaTek Helio G85 प्रोसेसरवर चालतो. विवो वाय 36 टी भारतीय बाजारात आणला जाईल की नाही, याची अजून पुष्टी झालेली नाही, मात्र या नवीन विवो फोनचे फिचर्स, स्पेसिफिकेशन आणि किंमतीची माहिती तुम्ही पुढे वाचू शकता.

Vivo Y36t स्पेसिफिकेशन

स्क्रीन : Vivo Y36t स्मार्टफोन 1612 × 720 पिक्सल रेजोल्यूशन असणाऱ्या 6.56 इंचाच्या वॉटरड्रॉप नॉच डिस्प्लेवर लाँच झाला आहे. ही एलसीडी स्क्रीन आहे जी 60Hz रिफ्रेश रेट तसेच 180Hz टच सॅम्पलिंग रेटवर चालते.

प्रोसेसर : विवो वाय 36 टी अँड्रॉईड 14 आधारित OriginOS वर सादर करण्यात आला आहे. प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये MediaTek Helio G85 ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे जो 2.0GHz क्लॉक स्पीडवर रन करण्याची क्षमता ठेवतो.

मेमरी : Vivo Y36t चीनमध्ये 6 जीबी रॅमवर लाँच करण्यात आला आहे ज्यासोबत 128 जीबी इंटरनल स्टोरेज आहे. हा मोबाईल LPDDR4X RAM + eMMC5.1 storage टेक्नॉलॉजीवर चालते.

कॅमेरा : फोटोगाफ्रीसाठी विवो वाय 36 टी च्या बॅक पॅनलवर एफ/2.2 अपर्चर असलेला 13 मेगापिक्सल रिअर कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी Vivo Y36t 8 मेगापिक्सल फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

बॅटरी : पावर बॅकअपसाठी हा विवो स्मार्टफोन 5,000mAh battery ला सपोर्ट करतो. तसेच फोन चार्जसाठी या मोबाईलमध्ये 15W फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी पण मिळते.

इतर फिचर्स : विवो वाय 36 टी 4 जी फोन IP54 सर्टिफाईड आहे जो याला पाणी व धूळीपासून सुरक्षित ठेवतो. सिक्योरिटीसाठी मोबाईलमध्ये फेस रेक्गनेशन फिचर देण्यात आले आहे तसेच या फोनमध्ये 150% लाऊड वॉल्यूम मोड पण आहे.

Vivo Y36t ची किंमत

विवोने आपल्या नवीन फोनला ​चीनमध्ये सिंगल व्हेरिएंटमध्ये सादर केले आहे. यात 6GB RAM + 128GB Storage देण्यात आले आहे ज्याची किंमत 799 yuan आहे. ही किंमत भारतीय चलनानुसार 9,350 रुपयांच्या आसपास आहे. सध्या फोनच्या भारतातील लाँच संबंधित कोणतीही माहिती समोर आलेली नाही.