मार्केटमध्ये खळबळ उडवण्यासाठी Motorola Edge 50 Ultra येत आहे, भारतातील लाँचची झाली पुष्टी

भारतीय स्मार्टफोन मार्केटमध्ये Motorola मोबाईलची उंची हळूहळू पण निश्चितपणे वाढत आहे. ही कंपनी परवडणाऱ्या आणि प्रीमियम अशा दोन्ही विभागांमध्ये जबरदस्त कामगिरी करत आहे. Motorola ने नुकतेच लाँच केलेले Edge 50 Pro आणि Edge 50 Fusion हे मोबाईल बऱ्यापैकी यशस्वी ठरले आहेत. तसेच आता कंपनी या सीरीजअंतर्गत भारतात एक नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन Motorola Edge 50 Ultra लाँच करणार आहे.

Motorola Edge 50 Ultra भारतात लाँच

Motorola India ने अधिकृतपणे घोषणा केली आहे की तो भारतीय बाजारात नवीन स्मार्टफोन लाँच करणार आहे. कंपनीने फोनचा टिझर फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये Motorola Edge 50 Ultra दिसत आहे. सध्या, लाँचची तारीख उघड केलेली नाही. परंतु, आशा करू शकता की Motorola Edge 50 Ultra जूनच्या अखेरीस भारतात लाँच होईल.

Motorola Edge 50 Ultra चे स्पेसिफिकेशन

  • 6.7 इंचाचा ओएलईडी 144 हर्ट्झ डिस्प्ले
  • क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 एस जेन 3
  • 16 जीबी रॅम + 1 टीबी स्टोरेज
  • 50 एमपी + 50 एमपी +64 एमपी बॅक कॅमेरा
  • 50 मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा
  • 4,500 एमएएच बॅटरी
  • 50 वॉट वायरलेस चार्जिंग

डिस्प्ले: Motorola Edge 50 Ultra हा 2712×1220 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.7 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. ही स्क्रीन OLED पॅनलवर बनली आहे जी 144Hz रिफ्रेश रेटवर काम करते. या डिस्प्ले मध्ये HDR 10+ आणि 2500nits पीक ब्राईटनेस सारखी वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत.

प्रोसेसर: Motorola फोन Android 14 OS वर तयार करण्यात आला आहे, जो जागतिक बाजारपेठेत Qualcomm Snapdragon 8s Gen 3 ऑक्टाकोर प्रोसेसरवर सादर करण्यात आला आहे. हा 4 नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर तयार केलेला मोबाईल चिपसेट आहे, जो 3GHz क्लॉक स्पीडने रन करतो. तर हाच प्रोसेसर भारतातही दिला जाईल, अशी अपेक्षा आहे.

मेमरी: आंतरराष्ट्रीय बाजारात हा फोन 16GB RAM च्या पॉवरने सुसज्ज आहे. ज्यामध्ये 1TB स्टोरेज देण्यात आले आहे. हा मोटोरोला मोबाईल LPDDR5X RAM + UFS 4.0 स्टोरेज तंत्रज्ञानावर काम करतो. आशा आहे की, भारतातही या मोबाईल मध्ये 16GB RAM पाहायला मिळेल.

बॅक कॅमेरा: Edge 50 Ultra च्या मागील पॅनलवर फोटोग्राफीसाठी F/1.6 अपर्चरसह 50 मेगापिक्सेल OIS मुख्य सेन्सर प्रदान केला आहे, जो 50 मेगापिक्सेल Ultra-Wide Samsung JN1 सेन्सर आणि 64 मेगापिक्सेल 3X पोर्ट्रेट टेलीफोटो ओम्निव्हिजन OV64B लेन्ससह एकत्र काम करते.

फ्रंट कॅमेरा: Motorola Edge 50 Ultra हा स्मार्टफोन सेल्फी, व्हिडिओ कॉलिंग आणि रिल बनवण्यासाठी 50 मेगापिक्सेल सेल्फी कॅमेराला सपोर्ट करतो. ही F/1.9 अपर्चरवर काम करणारी लेन्स आहे जी ऑटो फोकस तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे.

बॅटरी: Motorola Edge 50 Ultra स्मार्टफोनमध्ये पॉवर बॅकअपसाठी 4,500mAh बॅटरी आहे. ही मोठी बॅटरी जलद चार्ज करण्यासाठी एकीकडे 125W टर्बोपॉवर फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे हा स्मार्टफोन 50 वॅट वायरलेस चार्जिंग आणि 5 वॅट रिव्हर्स चार्जिंग टेक्नॉलॉजीलाही सपोर्ट करतो.

इतर फिचर्स: आम्ही तुम्हाला सांगतो की Motorola Edge 50 Ultra हा IP68 रेटिंग असलेला फोन आहे. यात 3 मायक्रोफोन्स आणि डॉल्बी ॲटमॉस स्टिरिओ स्पीकरसारखे फिचर्स मिळतात. तर कनेक्टिव्हिटीसाठी यामध्ये Wi-Fi 7, Bluetooth 5.4 आणि NFC सारखे पर्याय आहेत.

Motorola Edge 50 Ultra ची भारतातील किंमत (अपेक्षित)

Motorola Edge50 Ultra हा फ्लॅगशिप स्मार्टफोन असेल जो महागड्या किमतीत लाँच केला जाईल. जर हा 16 GB रॅमचा फोन भारतात लाँच झाला तर त्याची किंमत 50 हजार रुपयांच्या वर जाऊ शकते. तर Edge 50 Ultra या फोनच्या 12GB RAM चा दर सुमारे 42,000 रुपये आहे. दरम्यान, ही फोनची सुरुवातीची किंमत असेल.

Motorola Edge 50 Ultra ची स्पर्धा

किमतीच्या श्रेणीबद्दल बोलायचे झाल्यास, Motorola Edge 50 Ultra साठी भारतातील सर्वात कठीण स्पर्धा OnePlus 12 आणि OnePlus 12R या मोबाईल सोबत निश्चितपणे असणार आहे. त्याच वेळी या महिन्यात लाँच होणारे Xiaomi 14 CIVI आणि Realme GT 6 देखील Motorola ला आव्हान देऊ शकतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here