Categories: बातम्या

भारतात लाँच झाली सर्वात जास्त रेंज देणारी Electric Car, किंमत आहे इतकी…

Mercedes-Benz Electric Car: इलेक्ट्रिक कार (Electric Car) घेताना सर्वात जास्त महत्व तिच्या रेंजला दिलं जातं. सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या इलेक्ट्रिक कार्स जास्त रेंज देत नसल्यामुळे ग्राहक त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात. परंतु आता भारतातील सर्वात जास्त रेंज असलेली इलेक्ट्रिक कार लाँच झाली आहे. मर्सिडीज बेंजनं आपली Mercedes-Benz EQS 580 4Matic इलेक्ट्रिक कार (Mercedes-Benz EQS 580 4Matic Price and Range) लाँच केली आहे. ही लग्जरी ईव्ही 857 किमीची ARAI सर्टिफाइड रेंज देण्याचा दावा करते. खास बाब म्हणजे ही पहिली मेड इन इंडिया इलेक्ट्रिक लग्जरी कार आहे, जी कंपनीच्या पुण्यातील चाकण प्लांटमध्ये बनवण्यात आली आहे.

25 लाख रुपयांमध्ये करा बुक

कंपनीनं या कारची बुकिंग आधीच सुरु केली होती. ग्राहक ही 25 लाख रुपयांमध्ये बुक करू शकतात. कंपनीच्या साइटवर जाऊन भारतातील सर्वात जास्त रेंज देणारी ही Electric Car बुक करता येईल. चला जाणून घेऊया या कारची किंमत आणि इतर माहिती. हे देखील वाचा: How To Activate Airtel 5G: फक्त स्मार्टफोन असून फायदा नाही, Airtel युजर्स असं करा 5G अ‍ॅक्टिव्हेट

प्राइस

मर्सिडीजनं हिची किंमत 1.55 कोटी रुपये (एक्स-शोरूम) ठेवली आहे. Mercedes-Benz Car Launch दरम्यान केंद्रीय मंत्री नितिन गडकरी देखील उपस्थित होते आणि त्यांनी जर्मन प्रीमियम कार निर्माता मर्सिडीज-बेंजला स्थानिक स्तरावर कार बनवण्यास सांगितलं त्यामुळे किंमत कमी होईल. आता तर मी देखील ही कार खरेदी करू शकत नाही, असं देखील गडकरी म्हणाले.

Mercedes-Benz EQS 580 4Matic चे फीचर्स

Mercedes-Benz EQS 580 4Matic चा लुक बघून जितका शानदार आहे तितका आतून देखील आकर्षक आहे. मर्सिडीज-बेंज ईक्यूएस 580 एक ‘हायपरस्क्रीन’ सह येते, ज्यात एक ग्लास पॅनलद्वारे एक साथ 3 स्क्रीनचा समावेश आहे. ड्रायव्हर समोर एक 12.3-इंचाची स्क्रीन मिळते, तर सेंटरमध्ये 17.7-इंचाची इंफोटेनमेंट स्क्रीन आहे. इलेक्ट्रिक सेडान 3डी मॅप्स, हेड-अप डिस्प्ले, मसाज फंक्शनसह फ्रंट सीट्स, बर्मेस्टर 3डी साउंड सिस्टम, एयर फिल्ट्रेशन आणि रियर सीट पॅसेंजर्ससाठी एमबीयूएक्स टॅबलेटसह येते. सुरक्षेसाठी यात नऊ एयरबॅग, लेन चेंज आणि लेन कीप असिस्ट आणि आपत्कालीन स्टॉप सिस्टम आहे. हे देखील वाचा: वनप्लस करणार शक्तिप्रदर्शन! 100W SuperVOOC चार्जिंग आणि दणकट प्रोसेसरसह होणार OnePlus 11R ची एंट्री

Mercedes-Benz EQS 580 107.8kWh लिथियम-आयन बॅटरी पॅकसह येते, जी दोन इलेक्ट्रिक मोटर्सना पावर देते. ज्या 523bhp पावर आणि 855Nm टॉर्क निर्माण करतात. या कारचा टॉप स्पीड 210kmph आहे. ही कार 4.3 सेकंदात 0-100kmph चा स्पीड गाठू शकते. त्याचबोरबर यात बॅटरी पॅक 200kW DC फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते, त्यामुळे फक्त 15 मिनिटांत 300km ची रेंज मिळते. नवीन मर्सिडीज ईक्यूएस 580 मध्ये सिंगल चार्जमध्ये 857 किमीची एआरएआय सर्टिफाइड रेंज मिळते.

Published by
Siddhesh Jadhav