How To Activate Airtel 5G: फक्त स्मार्टफोन असून फायदा नाही, Airtel युजर्स असं करा 5G अ‍ॅक्टिव्हेट

airtel 5g launch in india before mukesh ambani jio 5g

How To Activate Airtel 5G: एयरटेलनं भारतात आपली 5G सेवा सुरु केली आहे. 1 ऑक्टोबर 2022, शनिवारी इंडिया मोबाइल कांग्रेस (IMC 2022) दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात 5G सेवेचे उद्घाटन केलं. दरम्यान भारती एयरटेलचे चेयरमन सुनील भारती मित्तल यांनी एयरटेलच्या 5जी (Airtel 5G) सेवेची घोषणा देखील केली. सुनील मित्तल यांनी आपल्या भाषणात सांगितलं की आज शनिवार 1 ऑक्टोबरपासून देशातील देशातील 8 शहरांमध्ये (Airtel 5G Cities) एयरटेल युजर्स 5G सेवेचा वापर करू शकतील. जर तुम्ही देखील Airtel ची 5G सेवा वापरू इच्छित असाल तर आम्ही तुम्हाला एयरटेल 5G वापरण्याची स्टेप बाय स्टेप प्रोसेस सांगणार आहोत.

Airtel 5G सर्वप्रथम या शहरांमध्ये सुरु

Airtel 5G सेवा एक ऑक्टोबरपासून मुंबई, नागपूर, दिल्ली, वाराणसी, बेंगुलुरू, हैद्राबाद, चेन्नई आणि सिलिगुरी या आठ शहरांमध्ये सुरु झाली आहे. कंपनीनं अजूनही अचूक लोकेशन किंवा सर्कलची माहिती दिली नाही जिथे 5G सेवा सुरु करण्यात आली आहे.

तुमच्या फोन आणि लोकेशनवर 5G असं करा चेक

एयरटेलनं कंफर्म केलं आहे की युजर्स आपल्या परिसरातील 5G नेटवर्कची उपलब्धता 5G स्मार्टफोनमध्ये Airtel Thanks अ‍ॅपच्या मदतीनं चेक करू शकतात. हे देखील वाचा: वनप्लस करणार शक्तिप्रदर्शन! 100W SuperVOOC चार्जिंग आणि दणकट प्रोसेसरसह होणार OnePlus 11R ची एंट्री

How To Activate Airtel 5G In Your 5G Smartphone

5G वापरण्यासाठी आवश्यक गोष्टी

5G नेटवर्क: 5G सेवा वापरण्यासाठी तुमच्या एरियामध्ये 5G नेटवर्क असणं आवश्यक आहे. एयरटेलनं आधीच सांगितलं आहे की सध्या त्यांची 5G सेवा काही ठरविक ठिकाणीच उपलब्ध आहे जिथे त्यांचे 5G टॉवर इंस्टॉल करण्यात आले आहेत.

5G स्मार्टफोन: 5G सेवा वापरण्यासाठी तुम्हाला 5G कम्पॅटिबल स्मार्टफोनची गरज पडेल. तुम्ही 4G स्मार्टफोनवर 5G वापरू शकणार नाही. कंपनीनं 5G साठी नवीन रिचार्ज प्लॅन्स सादर केले नाहीत, त्यामुळे तुम्ही 4G च्या रेट्सवर 5G वापरू शकाल.

Airtel 5G कसं अ‍ॅक्टिव्हेट करायचं | How to Activate Airtel 5G

एयरटेलनं कंफर्म केलं आहे की त्यांचं 4G सिम 5G रेडी आहे. त्यामुळे तुम्हाला 5G सेवेचा लाभ घेण्यासाठी नव्या सिमची आवश्यकता नाही. तुम्ही तुमच्या स्मार्टफोनवरून 5G अ‍ॅक्टिव्ह करू शकता. हे देखील वाचा: जियोला मागे टाकत Airtel नंबर वन! 8 शहरांमध्ये आजपासून सुरु होणार एयरटेल 5जी सर्व्हिस

स्टेप 1: 5G अ‍ॅक्टिव्ह करण्यासाठी फोनच्या सेटिंग अ‍ॅपवर जा.

स्टेप 2: इथे तुम्हाला कनेक्शन्स किंवा मोबाइल नेटवर्कचा ऑप्शन दिसेल.

How To Activate Airtel 5G In Your 5G Smartphone

स्टेप 3: या ऑप्शनमध्ये जाऊन तुम्हाला नेटवर्क मोड 5G/4G/3G/2G निवडण्याचा पर्याय दिसेल.

How To Activate Airtel 5G In Your 5G Smartphone

स्टेप 4: 5G सिलेक्ट करा म्हणजे आपोआप 5G सुरु होईल. तुमच्या एरियामध्ये एयरटेलचं 5G नेटवर्क असेल तर तुम्हाला 5G चा लोगो दिसेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here