Bounce नं अखेरीस आपली Bounce Infinity E1 electric scooter विक्रीसाठी ई-कॉमर्स साइट Flipkart वर उपलब्ध केली आहे. शॉपिंग साईटवर जाऊन तुम्ही आता घर बसल्या ही बॅटरी असलेली स्कूटर विकत घेऊ शकता. विशेष म्हणजे Bounce Infinity E1 कंपनीचं पाहिलं प्रोडक्ट आहे जे फ्लिपकार्ट वेबसाईटवर विकलं जात आहे. सध्या या स्कूटरची विक्री फक्त तेलंगणा, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक आणि नवी दिल्लीत केली जात आहे. म्हणजे जर तुम्ही इतर राज्यांत राहत असाल तर ही ऑनलाइन विकत घेता येईल आणि काही दिवसांत ही इलेक्ट्रिक स्कूटर तुमच्या घरी डिलिव्हर केली जाईल.
15 दिवसांत घरपोच इलेक्ट्रिक स्कूटी
Flipkart वरून ही स्कूटर विकत घेतल्यास कंपनी 15 दिवसांत ग्राहकांच्या दारावर ही ई-स्कूटर की डिलिव्हरी करेल, असा दावा देखील Bounce नं केला आहे. ऑनलाइन ऑर्डरनंतर बाउंस डीलरशिप ग्राहकांशी संपर्क साधून विमा आणि आरटीओ रजिस्ट्रेशन मिळवून देण्यास देखील मदत करेल.
ऑनलाइन अशी करा इलेक्ट्रिक स्कूटर
ई-कॉमर्स साईट Flipkart वर ही स्कूटर विकत घेण्याची पद्धत अगदी इतर वस्तू खरेदी करण्यासारखीच आहे. यासाठी तुम्हाला ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर स्कूटरसाठी एक्स-शोरूम प्राईसचं पेमेंट करावं लागेल. तसेच यात राज्य सरकारकडून मिळणारी EV सबसिडी देखील जोडण्यात येईल.
फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
बाउंस इन्फिनिटी दोन किलोवॉट-तास च्या लिथियम-आयन बॅटरीसह येते. ही एकदा चार्ज केल्यावर 85 किमीची रेंज देते. तसेच या ई-स्कूटरमध्ये 65kmph टॉप स्पीड आहे. यात एक ड्रॅग मोड देण्यात आला आहे युजर्सना पंचर झाल्यावर स्कूटर खेचण्यास मदत करतो. नवीन इन्फिनिटीमध्ये दोन्ही बाजूंना 12-इंचाचं चाक देण्यात आलं आहे. तसेच यात चांगल्या स्टॉपिंग पावरसाठी फ्रंट आणि रियर डिस्क ब्रेक देण्यात आला आहे.
बाउंस इन्फिनिटी E1 ची प्राईस
या इलेक्ट्रिक स्कूटरची प्राईस पाहता महाराष्ट्रात 69,999 रुपये (एक्स-शोरूम), दिल्लीत 68,999 रुपये (एक्स-शोरूम), गुजरातमध्ये 59,999 रुपये (एक्स-शोरूम), राजस्थानमध्ये 72,999 रुपये (एक्स-शोरूम), कर्नाटकात 68,999 रुपये (एक्स-शोरूम) आणि इतर राज्यांमध्ये हिची किंमत 79,999 रुपये (एक्स-शोरूम) असेल. महत्वाची बाब म्हणजे ग्राहकांनी निवडलेल्या सब्सक्रिप्शन मॉडेलवर देखी अवलंबुन असेल. या ई-स्कूटरच्या दोन मॉडेल- बीएएएस 1 व बीएएएस 2 ची विक्री केली जात आहे.
Bounce Infinity E1 इलेक्ट्रिक स्कूटर बॅटरीविना विकत घेण्याचे दोन ऑप्शन आहेत. यात तुम्हाला बॅटरी भाड्याने घ्यावी लागेल. या दोन्ही ऑप्शनची किंमत पुढीलप्रमाणे:
| बॅटरी भाड्याने विकत घेण्याची किंमत | ||
| एक्स शोरूम | किंमत (ऑप्शन 1) | किंमत (ऑप्शन 2) |
| दिल्ली | ₹56,999 | ₹45,099 |
| गुजरात | ₹47,999 | ₹36,099 |
| महाराष्ट्र | ₹57,999 | ₹46,099 |
| राजस्थान | ₹60,999 | ₹49,099 |
| कर्नाटक | ₹56,999 | ₹45,099 |
| इतर राज्य | ₹67,999 | ₹56,099 |
| बॅटरी सर्विस मंथली सब्सक्रिप्शन | ₹849 | ₹1,249 |
| बॅटरी स्वाइप चार्ज | ₹35 | ₹35 |
