Home बातम्या 8GB RAM सह OnePlus Nord 4 सर्टिफिकेशन साईटवर झाला लिस्ट, 16 जुलैला होईल भारतात लाँच

8GB RAM सह OnePlus Nord 4 सर्टिफिकेशन साईटवर झाला लिस्ट, 16 जुलैला होईल भारतात लाँच

OnePlus Nord 4 16 जुलैला भारतात लाँच होईल. या दिवशी कंपनी OnePlus Summer Launch event चे आयोजन करणार आहे ज्याच्या मंचावरून अनेक वनप्लस डिव्हाईस मार्केटमध्ये आणले जातील. वनप्लस नॉर्ड 4 अधिकृत घोषणा होण्याच्या आधी आता बेंचमार्किंग साईट गीकबेंचवर लिस्ट झाला आहे जिथे स्मार्टफोनचे अनेक महत्त्वाचे स्पेसिफिकेशन समोर आले आहेत. याची सर्व माहिती तुम्ही पुढे वाचू शकता.

OnePlus Nord 4 गीकबेंच लिस्टिंग

OnePlus Nord 4 चे स्पेसिफिकेशन (लीक)

डिस्प्ले : लीकनुसार या फोनमध्ये 6.74 इंचाची 1.5K ओएलईडी स्क्रीन दिली जाऊ शकते. याला Tianma U8+ डिस्प्ले सांगितले जात आहे जो 120Hz रिफ्रेश रेट, 2150nits ब्राइटनेस आणि इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर सारख्या फिचर्सला सपोर्ट करेल.

परफॉर्मन्स : OnePlus Nord 4 ला 4 नॅनोमीटरवर बनवलेल्या Qualcomm Snapdragon 7+ Gen 3 ऑक्टा-कोर प्रोसेसरवर लाँच केले जाऊ शकते. तसेच लीकनुसार हा मोबाईल 8GB RAM आणि 12GB RAM ला सपोर्ट करेल ज्याच्यासोबत 128GB, 256GB तसेच 512GB स्टोरेज मिळेल.

कॅमेरा : फोटोग्राफीसाठी वनप्लस नॉर्ड 4 5 जी ड्युअल रिअर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. यात OIS टेक्नॉलॉजी असलेला 50MP SONY LYT 600 मेन सेन्सर तसेच 8MP Ultra-wide IMX355 लेन्स मिळू शकते. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी OnePlus Nord 4 मध्ये 16MP Front कॅमेऱ्यासह लाँच होऊ शकतो जो Samsung S5K3P9 सेन्सर असेल.

बॅटरी : पावर बॅकअपसाठी OnePlus Nord 4 5G फोनला 5,500mAh बॅटरीसह बाजारात आणले जाऊ शकते. तसेच ही मोठी बॅटरी फास्ट चार्ज करण्यासाठी स्मार्टफोनमध्ये 100W फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी दिली जाऊ शकते.

OnePlus Nord 4 ची किंमत (लीक)

लीकमध्ये समोर आले आहे ​कि वनप्लस नॉर्ड 4 31,999 रुपयांमध्ये भारतात लाँच होईल. लीकमध्ये परंतु हे नाही सांगण्यात आले आहे की हा मोबाईलतची प्रारंभिक किंमत असेल या सर्वात मोठ्या मॉडेलची किंमत असेल. आशा आहे की हा 8GB RAM असणाऱ्या बेस व्हेरिएंटची किंमत असू शकते तसेच 12GB RAM असलेला सर्वात मोठा मेमरी व्हेरिएंट 35,999 रुपयांमध्ये भारतात लाँच होऊ शकतो.