रियलमीचा पावरफुल फोन Realme GT 5G स्मार्टफोन 4 मार्चला होईल लॉन्च, कंपनीने केला खुलासा

रियलमी आपली नवीन Narzo 30 सीरीज भारतात 24 फेब्रुवारीला लॉन्च करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. दुसरीकडे कंपनी फ्लॅगशिप स्मार्टफोन Realme GT 5G आपल्या घरच्या मार्केट चीनमध्ये 4 मार्चला लॉन्च करेल. रियलमीच्या वाइस प्रेसिडेंटनी वीबोवर लॉन्च डेटची माहिती देत एक इन्वाइट पोस्टर शेयर केला आहे. हा फोन कंपनी सर्वप्रथम चीनमध्ये लॉन्च करेल. आशा आहे कि नंतर हा फोन भारतात पण येईल. पण, सध्यातरी याबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही.

वीबोवर लॉन्च डेटची माहिती देत कंपनीच्या वाइस प्रेसिडेंटनी सांगितले फोन स्नॅपड्रॅगॉन 888 च्या पावरसह सादर केला जाईल. या स्मार्टफोन मध्ये GT इंस्पायर्ड डिजाइनसह रेक्टँगुलर कॅमेरा यूनिट असेल, ज्यात तीन कॅमेरा असतील. इतकेच नव्हे तर काही दिवसांपूर्वी हा फोन TENAA लिस्टिंगमध्ये पण दिसला होता.

हे देखील वाचा : अश्याप्रकारे करा मोफत YouTube व्हिडीओ डाउनलोड

Realme VP नुसार, Realme GT 5G मध्ये फक्त स्नॅपड्रॅगॉन 888 चिपसेटची माहिती देण्यात आली नाही. स्पीड आणि डिजाइनची माहिती पण देण्यात आली आहे. आम्हाला आधीच याची झलक मिळाली आहे कि स्मार्टफोन टीजर इमेजच्या माध्यमातून कसा दिसतो. गेल्या काही दिवसांपासून रियलमीच्या Race कोडनेम असलेल्या स्मार्टफोनबद्दल माहिती समोर येत होती. बोलले जात आहे कि रेसच रियलमी जीटी 5जी फोन असेल.

TENAA लिस्टिंगनुसार फोन मध्ये पंच-होल डिस्प्ले दिली जाईल. फोनमध्ये 6.81 इंचाचा OLED पॅनल दिला जाऊ शकतो, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz असेल. तसेच बोलले जात आहे कि कंपनी यात 3K रेजॉलूशन आणि 160Hz रिफ्रेश रेट असलेला डिस्प्ले दिला जाईल. तसेच हा कंपनीचा पहिला स्मार्टफोन असेल जो 125 वॉट अल्ट्राडार्ट फास्ट चार्जिंगसह येईल.

हे देखील वाचा : बदलेल भारतातील ‘गेमिंग स्मार्टफोन’ ची दुनिया, 16GB रॅम आणि 6000mAh बॅटरीसह येत आहे Asus ROG Phone 5

फोटोग्राफीसाठी रियलमी GT मध्ये 64 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा मिळेल. फोनच्या बॅक पॅनल मध्ये खाली तुम्हाला GT चा लोगो पण दिसेल. एक रिपोर्ट समोर आला होता कि डिवाइसमध्ये 12जीबी रॅमसह 256जीबी बिल्ट-इन स्टोरेज असेल. फोन अँड्रॉइड 11 ओएसवर बेस्ड Realme UI वर चालेल. इतकेच नव्हे तर फोन भारतातील BIS वर सर्टिफिकेशनवर दिसला होता.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here