Lava Z34 चे डिजाइन आणि स्पेसिफिकेशन्स आले समोर, बीआईएस, एफसीसी आणि गीकबेंचवर आला फोन

Highlights

  • Lava Z34 LEX401 मॉडेल नंबरसोबत समोर आला आहे.
  • यात 4,950mAh च्या बॅटरीचा सपोर्ट मिळू शकतो.
  • हा मीडियाटेक हेलियो G35/P35 चिपसेट सोबत येऊ शकतो.

स्वस्त स्मार्टफोन बनवून भारतीय युजर्सना आकर्षित करणारा ब्रँड लावा आपला नवीन फोन Lava Z34 नावाने लाँच करू शकतो. मोबाइल सादर होणार असल्याची बातमी पण यामुळे आली असेल कारण हा प्रमुख स्पेसिफिकेशन आणि डिजाइनसह एफसीसी आणि गीकबेंच वेबसाइटवर समोर आला आहे. त्याचबरोबर याची बीआयएस सर्टिफिकेशनवर पण नोंदणी करण्यात आली आहे. चला, पुढे या प्लॅटफॉर्मवर आलेली माहिती सविस्तर जाणून घेऊया.

Lava Z34 एफसीसी लिस्टिंग

  • लावाचा नवीन फोन LEX401 मॉडेल नंबर सोबत FCC प्लॅटफॉर्मवर स्पॉट करण्यात आला आहे. यात फोनचा फोटो पण समोर आला आहे.
  • तुम्ही खाली दिलेल्या फोटोमध्ये पाहू शकता की आगामी LAVA Z34 हा गोल किनाऱ्यासोबत प्लास्टिक बॅक असलेला फोन आहे.
  • मोबाइलमध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर आणि वरती डाव्या बाजूला एक ट्रिपल कॅमेरा सेटअप दिसला आहे. पुढच्या बाजूला यामध्ये पंच-होल डिजाइन आहे.
  • फ्रेमच्या उजव्या साइडवर पावर बटन आणि वॉल्यूम बटन देण्यात आले आहेत. तर डाव्या साइडला सिम ट्रे देण्यात आला आहे.
  • फोनमध्ये सिंगल ग्रिल स्पिकर, यूएसबी टाइप सी आणि हेडफोन जॅक फ्रेमच्या खाली पाहू शकता.
  • लिस्टिंगनुसार असे समजले आहे की लावाच्या नवीन फोनमध्ये मीडियाटेक हेलियो G35/P35 चिपसेट मिळू शकतो.
  • बॅटरीच्या बाबतीत 4,950mAh ची बॅटरी आणि 10W चार्जिंगला सपोर्ट दिला जाऊ शकतो.
  • स्मार्टफोनचे डायमेंशन पाहता हा 164 मिमी (लेंथ) x 76 मिमी (विध्त ) x 8 मिमी (ऊंची) असल्याचे सांगण्यात आले आहे.

Lava Z34 गीकबेंच आणि बीआयएस लिस्टिंग

  • गीकबेंच आणि बीआयएस लिस्टिंगमध्ये पण नवीन लावा फोन LEX401 मॉडेल नंबरसह दिसला आहे.
  • गीकबेंच डेटाबेसवर स्मार्टफोनने सिंगल-कोर टेस्टमध्ये 175 आणि मल्टीकोर टेस्टमध्ये 648 स्कोर मिळवला आहे.
  • बेंचमार्किंग प्लॅटफॉर्मवर नवीन डिवाइस स्टोरेजच्या बाबतीत 4GB रॅमसह समोर आला आहे.
  • चांगले काम करण्यासाठी यात MediaTek Helio G35/P35 प्रोसेसर मिळणार असल्याची माहिती मिळाली आहे.

शेवटी जर तुम्ही बीआयएस लिस्टिंग पाहिले तर यात मॉडेल नंबर व्यतिरिक्त कोणतीही मोठी माहिती मिळाली नाही. परंतु या सर्व प्लॅटफॉर्मवर आल्याने असे वाटत आहे की LAVA Z34 चे लवकरच लाँच होईल.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here