OPPO चा नवीन मोबाईल A3 Pro 12 एप्रिलला घेणार एंट्री, मिळेल 12GB RAM

OPPO इंटरनॅशनल मार्केटमध्ये आपल्या प्रोडक्टचा पोर्टफोलियो वाढविणार आहे. कंपनी आपल्या ‘ए’ सीरिजमध्ये नवीन स्मार्टफोन जोडणार आहे, जो A3 Pro नावाने सादर होईल. हा मोबाईल सर्वप्रथम चीनमध्ये लाँच केला जाईल जो नंतर भारतासह इतर बाजारांमध्ये एंट्री घेईल. ओप्पो ए3 प्रो ची लाँचच्या तारखेसह इतर लीक झालेली माहिती तुम्ही वाचू शकता.

OPPO A3 Pro लाँचची तारिख

ओप्पो ए3 प्रो 5जी फोन 12 एप्रिलला चीनमध्ये लाँच होईल. या दिवशी कंपनी दुपारी 2 वाजून 30 मिनिटांनी एका कार्यक्रमाचे आयोजन करेल, ज्या मंचावरून फोनचे स्पेसिफिकेशन आणि किंमतीची माहिती दिली जाईल. भारतीय वेळेनुसार याची दुपारी 12 वाजता घोषणा होईल. ओप्पो चायनाच्या ऑफिशियल वेबसाईटसह चीनी मायक्रोब्लागिंग साईट वेईबोवर या लाँचच्या कार्यक्रमाला लाईव्ह पाहिले जाऊ शकते.

OPPO A3 Pro चा फोटो

तसेच मोबाईल 7 एप्रिलला बेंचमार्किंग साईट गीकबेंचवर MediaTek Dimensity 7050 चिपसेटसह लिस्ट झाला आहे. या मोबाईलमध्ये 12GB RAM आणि 2.6GHz क्लॉक स्पीड असलेला ऑक्टाकोर प्रोसेसर दिला जाणार असल्याची माहिती पण मिळाली आहे. कंपनीकडून अजून या मोबाईलचे फिचर्स व स्पेसिफिकेशनची माहिती देण्यात आली नाही. हा गेल्यावर्षी बाजारात आलेल्या ओप्पो ए 2 प्रोचे अपग्रेडेड व्हर्जन असेल.

OPPO A2 Pro चे स्पेसिफिकेशन

  • 6.70″ 120Hz AMOLED Display
  • MediaTek Dimensity 7050
  • 12GB Virtual RAM
  • 64MP Rear Camera
  • 67W Fast Charging

    स्क्रीन : ओप्पो ए2 प्रो 2412 × 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.70 इंचाचा 3 डी अ‍ॅमोलेड डिस्प्लेवर लाँच झाला होता. ही स्क्रीन 120 हर्ट्झ रिफ्रेश रेट तसेच 240 हर्ट्झ टच सॅम्पलिंग रेटवर चालते तसेच 950 निट्स ब्राइटनेसला सपोर्ट करते.

    प्रोसेसर : हा मोबाईल अँड्रॉइड 13 वर आला होता, ज्यात प्रोसेसिंगसाठी 2.6 गीगाहर्ट्झ क्लॉक स्पीडवर रन करणार असलेला मीडियाटेक डाइमेंसिटी 7050 ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे.

    मेमरी : ओप्पो ए2 प्रो 5जी फोन expansion technology टेक्नॉलॉजीसह आहे. या टेक्नॉलॉजीमुळे फोन फिजिकल रॅममध्ये 12 जीबी वचुर्अल रॅम एक्स्ट्रा जोडले जाऊ शकते, ज्यामुळे मोबाईलला 24 जीबी रॅम पर्यंतची पावर मिळते.

    कॅमेरा : फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे ज्यात एफ/1.7 अपर्चर असलेला 64 मेगापिवक्सल प्रायमरी सेन्सर आणि एफ/2.4 अपर्चर असलेला 2 मेगापिक्सल पोर्टरेट लेन्स आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी हा एफ/2.0 अपर्चर असलेला 8 मेगापिक्सल फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

    बॅटरी : OPPO A2 Pro पावर बॅकअपसाठी 5,000 एमएएच बॅटरीला सपोर्ट करतो. ही मोठी बॅटरी फास्ट चार्ज करण्यासाठी हा ओप्पो मोबाईल 67 वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला पण सपोर्ट करतो.

    इतर फिचर्स : ओप्पो ए 2 प्रो 5 जी फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, Wi-Fi 6 आणि Bluetooth 5.3 सारखे फिचर्स पण आहेत.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here