ओप्पोनं नवीन मोबाइल फोन OPPO A3 Pro 5G भारतात लाँच केला आहे. मिड बजेट सेग्मेंटमध्ये आलेल्या या स्मार्टफोनमध्ये 16GB RAM (8GB+8GB), MediaTek Dimensity 6300 प्रोसेसर, 45W SUPERVOOC चार्जिंग आणि 5,100mAh Battery ची पावर मिळते. नवीन ओप्पो ए3 प्रो 5जी फोनची किंमत आणि याचे स्पेसिफिकेशन्स तुम्ही पुढे वाचू शकता.
OPPO A3 Pro 5G ची किंमत
ओप्पो ए3 प्रो स्मार्टफोन 8GB RAM सह लाँच झाला आहे जो 128GB तसेच 256GB स्टोरेजच्या दोन व्हेरिएंट्समध्ये सेलसाठी उपलब्ध होईल. याच्या 128जीबी मेमरी व्हेरिएंटची किंमत 17,999 रुपये आहे तर 256जीबी मॉडेलचा रेट 19,999 रुपये आहे. हा ओप्पो मोबाइल Moonlight Purple आणि Starry Black कलरमध्ये शॉपिंग साइट व रिटेल स्टोर्सवर सेलसाठी उपलब्ध होईल जिथे 10% बँक डिस्काउंट देखील मिळेल.
OPPO A3 Pro 5G स्पेसिफिकेशन्स
स्क्रीन: OPPO A3 Pro 5G मध्ये 6.67 इंचाचा फुलएचडी+ पंच-होल डिस्प्ले देण्यात आला आहे. या स्क्रीनवर 120Hz रिफ्रेश रेट, 180Hz टच सॅम्पलिंग रेट तसेच 1000निट्स ब्राइटनेस मिळते.
प्रोसेसर: ओप्पो ए3 प्रो अँड्रॉइड 14 आधारित कलरओएसवर लाँच झाला आहे. प्रोसेसिंगसाठी यात 6नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला MediaTek Dimensity 6300 ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे जो 2.4GHz क्लॉक स्पीडवर चालू शकतो.
रॅम: हा नवीन ओप्पो मोबाइल 8GB RAM सह लाँच झाला आहे. कंपनीनं हा RAM Expansion टेक्नॉलॉजीसह बाजारात आणला आहे त्यामुळे 8जीबी फिजिकल रॅममध्ये 8जीबी वचुर्अल रॅम जोडता येतो. हा फोन 16GB RAM ची ताकद देईल.
कॅमेरा: फोटोग्राफीसाठी OPPO A3 Pro 5G फोन ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. याच्या बॅक पॅनलवर एलइडी फ्लॅशसह 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो सेकंडरी एआय लेन्ससह येतो. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा स्मार्टफोन 8MP च्या Front Camera ला सपोर्ट करतो.
बॅटरी: OPPO A3 Pro 5G फोन दमदार 5,100mAh Battery सह बाजारात आला आहे. तसेच ही मोठी बॅटरी फास्ट चार्ज करण्यासाठी फोनमध्ये 45W SUPERVOOC चार्जिंग टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे.
OPPO A3 Pro 5G स्पर्धा
ओप्पो ए3 प्रो ची प्रारंभिक किंमत 17999 रुपये आहे. या किंमतीत OnePlus Nord CE 3 Lite 5G फोन देखील विकला जात आहे. म्हणजे OPPO A3 Pro 5G ला सर्वात मोठी टक्कर वनप्लसकडूनच मिळेल. तसेच या आठवड्यात लाँच झालेले Vivo Y58 5G आणि Infinix Note 40 5G स्मार्टफोन देखील 20 हजारांपेक्षा कमी बजेटमध्ये ओप्पो ए3 प्रोला आव्हान देऊ शकतात.














