लो बजेटमध्ये लाँच होईल Lava Yuva Star स्मार्टफोन, स्पेसिफिकेशन आले समोर

Lava Blaze X भारतात लाँच होणार आहे. येत्या काही दिवसांमध्ये हा स्मार्टफोन भारतीय बाजारात आणला जाईल. ब्लेज सीरीजच्या या मोबाईल व्यतिरिक्त पण कंपनी एक आणि फोन लाँचसाठी तयार करत आहे जो Lava Yuva Star नावाने येईल. हा एक लो बजेट स्मार्टफोन असेल जो 4G ला सपोर्टसह मार्केटमध्ये येईल.

Lava Yuva Star लाँच टाईमलाईन आणि किंमत

लावा युवा स्टार स्मार्टफोनची माहिती पेशनेटगीक्ज वेबसाईटच्या माध्यमातून समोर आली आहे. रिपोर्टला इंडस्ट्री सोर्सनुसार छापण्यात आले आहे ज्यानुसार Lava Yuva Star 4G फोन भारतात Blaze X ची सेल सुरु झाल्यानंतर लाँच केला जाईल. या मोबाईलला ऑगस्ट महिन्यापर्यंत मार्केटमध्ये आणले जाऊ शकते. तसेच या लावा मोबाईलची किंमत 8 हजार रुपयांच्या आसपास ठेवली जाऊ शकते.

Lava Yuva Star चे स्पेसिफिकेशन

लीकनुसार लावा युवा स्टार यूनिसोक आक्टा-कोर प्रोसेसरवर लाँच केला जाईल. हा Unisoc T612 चिपसेट असू शकतो.

रिपोर्टनुसार Lava Yuva Star 4GB RAM आणि 6GB RAM के दोन मॉडेलमध्ये लाँच होईल तसेच यामध्ये 128GB storage दिले जाईल.

पावर बॅकअपसाठी लावा युवा स्टार 4 जी फोनमध्ये 5,000mAh battery दिली जाणार असल्याची गोष्ट लीकमध्ये समोर आली आहे. तसेच ही मोठी बॅटरी फास्ट चार्ज करण्यासाठी फोनमध्ये 18W फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी मिळू शकते.

लीकनुसार लावा युवा स्टार 4 जी फोन purple, white आणि black कलरमध्ये आणला जाईल. तसेच सिक्योरिटीसाठी यात साईड माऊंटेड फिंगरप्रिंट सेन्सर दिला जाऊ शकतो.

फोटोग्राफीसाठी या लावा मोबाईलमध्ये ‘स्टार’ शेप असलेला ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. लीकनुसार हा फोन 13 मेगापिक्सल + एआय लेन्स बॅक कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. तसेच फ्रंट पॅनलवर 8 मेगापिक्सल सेल्फी सेन्सर मिळू शकतो.

Lava Yuva 5G किंमत आणि स्पेसिफिकेशन

  • किंमत: लावा युवा 5 जी फोनच्या 4GB रॅम+ 64GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 9,499 रुपये आहे. तसेच मोबाईलच्या 4GB रॅम+128GB स्टोरेज असणाऱ्या मॉडेलला 9,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.
  • डिस्प्ले: Lava Yuva 5G मोबाईलमध्ये 6.52-इंचाची एलसीडी HD+ स्क्रीन देण्यात आली आहे. यावर 720×1600 पिक्सल रिजॉल्यूशन, 269ppi पिक्सल डेंसिटी, 90Hz रिफ्रेश रेट, 2.5D कर्व्ड ग्लास, आणि पंच-होल डिझाईन नॉच मिळत आहे.
  • प्रोसेसर: हा मोबाईल अँड्रॉईड 14 वर चालतो. प्रोसेसिंगसाठी यात UniSoC T750 चिपसेट देण्यात आली आहे तसेच ग्राफिक्ससाठी माली जी 57 जीपीयू आहे. हा फोन 4GB Virtual RAM टेक्नॉलॉजीसह आहे.
  • कॅमेरा: Lava Yuva 5G फोनमध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप आहे. ज्यात 50MP चा प्रायमरी कॅमेरा आणि 2MP चा इतर सेन्सर LED फ्लॅशसह देण्यात आला आहे. तसेच, फ्रंटला स्क्रीन फ्लॅशसह 8MP लेन्स आहे.
  • बॅटरी: डिव्हाईस चालविण्यासाठी Lava Yuva 5G मध्ये 5,000mAh ची मोठी बॅटरी आहे. याला फास्ट चार्ज करण्यासाठी 18W फास्ट चार्जिंग मिळते.
  • इतर : फोनमध्ये फेस अनलॉक, साईड फिंगरप्रिंट सेन्सर, ऑडियोसाठी 3.5mm ऑडियो जॅक, ड्युअल-सिम, 5G, WiFi 5 802.11 ac, ब्लूटूथ 5.0 सारखे ऑप्शन मिळतात.
LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here