91 मोबाईलला एक्सक्लूसिव्ह माहिती मिळाली आहे की पोको ब्रँड भारतात आपल्या ‘एम’ सीरीजचा विस्तार करण्याची प्लॅनिंग करत आहे आणि लवकरच POCO M6+ 5G फोन भारतात लाँच करू शकते. टिपस्टर सुधांशूकडून तपशील प्राप्त झाला आहे की पोको एम 6 प्लस 5 जी ची किंमत आणि स्पेसिफिकेशनसह फोनचा फोटो पण समोर आला आहे, ज्याला तुम्ही पुढे पाहू शकता.
POCO M6+ 5G ची किंमत
मिळालेल्या माहितीनुसार पोको एम 6 प्लस 5 जी फोन भारतात दोन रॅम व्हेरिएंट्समध्ये लाँच होईल. याच्या 6GB RAM + 128GB storage व्हेरिएंटची किंमत 13,999 रुपये सांगण्यात आली आहे. तसेच लीकनुसार POCO M6+ 5G 8GB RAM + 128GB मेमरी व्हेरिएंट 14,999 रुपयांमध्ये लाँच होईल. टिपस्टरनुसार या मोबाईलवर 1000 रुपयांचा बँक डिस्काऊंट पण दिला जाईल.
POCO M6+ 5G चा फोटो
POCO M6+ 5G चे स्पेसिफिकेशन
- 6.79″ 120 हर्ट्झ एलसीडी स्क्रीन
- क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 4 जेन 2
- 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज
- 108 मेगापिक्सल बॅक कॅमेरा
- 13 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा
- 33 वॉट 5,030 एमएएच बॅटरी
डिस्प्ले : मिळालेल्या माहितीनुसार POCO M6+ 5G फोन 6.79-इंचाच्या एलसीडी डिस्प्लेवर लाँच केला जाईल. या स्क्रीनवर 120 हर्ट्झ रिफ्रेश रेटला सपोर्ट मिळू शकतो.
प्रोसेसर : लीकनुसार हा मोबाईल अँड्रॉईड 14 वर लाँच होईल तसेच हायपरओएसवर काम करेल. तसेच प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 4 जेन 2 ऑक्टाकोर प्रोसेसर दिला जाऊ शकतो.
कॅमेरा : फोटोग्राफीसाठी POCO M6+ 5G 108 मेगापिक्सल कॅमेऱ्यासह लाँच होऊ शकतो ज्याच्या सोबत 2 मेगापिक्सलचे दोन सेन्सर मिळू शकतात. तसेच मोबाईलच्या फ्रंट पॅनलवर 13 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा दिला जाऊ शकतो.
बॅटरी : पावर बॅकअपसाठी पोको एम 6+ 5 जी फोनमध्ये 5,030 एमएएच बॅटरी दिली जाऊ शकते. तसेच याला फास्ट चार्ज करण्यासाठी स्मार्टफोनमध्ये 33 वॉट फास्ट चार्जिंगचा सपोर्ट मिळू शकतो.
इतर फिचर्स : लीकनुसार POCO M6+ 5G आइपी 53 रेटिंगसह येईल. यात 3.5 एमएम जॅक सह साईड मांऊटेड फिंगरप्रिंट सेन्सर दिला जाऊ शकतो.















