32MP Selfie कॅमेरा आणि 8GB RAM सह OPPO Reno 12F 4G स्मार्टफोन झाला ग्लोबली लाँच

OPPO Reno 12 आणि Reno 12 Pro भारतात लाँच झाल्यानंतर आता कंपनीने ग्लोबल मंचावर या सीरीजचा नवीन स्मार्टफोन Reno 12F 4G पण सादर केला आहे. 32MP Selfie Camera, 8GB RAM आणि 5000mAh Battery ची ताकद असलेला हा मोबाईल OPPO AI फिचरसह आला आहे ज्याची संपूर्ण माहिती तुम्ही पुढे वाचू शकता.

OPPO Reno 12F 4G चे स्पेसिफिकेशन

  • 6.67-इंचाचा 120 हर्ट्स अ‍ॅमोलेड डिस्प्ले
  • क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 685 प्रोसेसर
  • 8 जीबी रॅम + 512 जीबी स्टोरेज
  • 8 जीबी रॅम एक्सपांशन टेक्नॉलॉजी
  • 50 मेगापिक्सल बॅक कॅमेरा
  • 32 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा
  • 45 वॉट 5,000 एमएएच बॅटरी

डिस्प्ले : ओप्पो रेनो 12एफ 4जी फोन 2400 × 1080 पिक्सल रेजोल्यूशन असणाऱ्या 6.67 इंचाच्या FHD+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. ही AMOLED स्क्रीन आहे जी 120Hz रिफ्रेश रेट आणि 2100nits पिक ब्राईटनेसला सपोर्ट करते.

प्रोसेसर : OPPO Reno12 F 4G अँड्रॉईड 14 वर लाँच झाला आहे जो ColorOS 14.1 वर चालतो. प्रोसेसिंगसाठी या ओप्पो मोबाईलमध्ये क्वॉलकॉम Snapdragon 685 ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे जो 2.8GHz क्लॉक स्पीडवर रन करण्याची क्षमता ठेवतो.

मेमरी : ग्लोबल वेबसाईटवर हा फोन 8GB RAM सह लिस्ट झाला आहे जो 256GB तसेच 512GB स्टोरेजला सपोर्ट करतो. फोनमध्ये 8GB RAM Expansion टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे जी ​वचुर्अल रॅम व फिजिकल रॅमला जोडून याला 16GB RAM ची ताकद देतो. हा डिव्हाईस LPDDR4x RAM आणि UFS 2.2 storage टेक्नॉलॉजीवर चालतो.

फ्रंट कॅमेरा : सेल्फी काढणे तसेच व्हिडिओ कॉलिंग करण्यासाठी ओप्पो रेनो 12 एफ 4 जी स्मार्टफोन 32MP फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. ही 5P लेन्स आहे जी एफ/2.4 अपर्चरवर चालते तसेच 82° FOV ला सपोर्ट करतो. या फोनवरून 1080p@30fps व्हिडिओ रेकॉर्ड केला जाऊ शकतो.

बॅक कॅमेरा : फोटोग्राफीसाठी Reno12 F 4G मध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा आहे. फोनच्या बॅक पॅनलवर एफ/1.8 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सल मेन सेन्सर देण्यात आला आहे जो 8MP Ultra-wide अँगल लेन्स तसेच 2MP Macro सेन्सरसह मिळून चालतो.

बॅटरी : ओप्पो रेनो 12 एफ 4 जी स्मार्टफोनमध्ये पावर बॅकअपसाठी 5,000 एमएएच बॅटरी देण्यात आली आहे. तसेच ही मोठी बॅटरी फास्ट चार्ज करण्यासाठी 45W SUPERVOOC फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी मिळते.

इतर फिचर्स : हा ओप्पो मोबाईल AI LinkBoost, AI Eraser, AI Studio आणि AI Smart Image Matting 2.0 सारखे ओप्पो एआय फिचर्ससह आहे. फोनला IP64 रेटिंग मिळते, तसेच यात 300% अल्ट्रा वॉल्यूम मोड असणारे Dual Stereo Speakers पण देण्यात आले आहेत.

OPPO Reno 12F 4G ची किंमत अंदाजे

ओप्पो रेनो 12 एफ 4 जी स्मार्टफोन कंपनीच्या ग्लोबल वेबसाईटवर लिस्ट झाला आहे. फोनची सर्व माहिती सार्वजनिक झाली आहे मात्र सध्या याची किंमत पडद्यामध्ये ठेवण्यात आली आहे. फिचर्स तसेच स्पेसिफिकेशन पाहता अंदाज लावला जात आहे की भारतीय चलनानुसार OPPO Reno 12F 4G किंमत 18,000 रुपयांच्या आसपास ठेवली जाऊ शकते. किंमतीची अधिकृतपणे घोषणा झाल्यावर ही बातमी अपडेट केली जाईल. ओप्पो रेनो 12 एफ 4 जी फोन ग्लोबल मार्केटमध्ये Amber Orange, Olive Green आणि Matte Grey कलरमध्ये विकला जाईल.

OPPO Reno 12 Pro किंमत आणि स्पेसिफिकेशन

  • 12GB RAM + 256GB Storage = 36,999 रुपये
  • 12GB RAM + 512GB Storage = 40,999 रुपये

ओप्पो रेनो 12 प्रो 5 जी फोन 12 जीबी रॅमवर लाँच झाला आहे ज्याच्या 256 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 36,999 रुपये आहे तसेच 512 जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत 40,999 रुपये आहे. या ओप्पो मोबाईलला Sunset Gold आणि Space Brown कलरमध्ये विकत घेता येईल.

OPPO Reno 12 किंमत आणि स्पेसिफिकेशन

  • 8GB RAM + 256GB Storage = 32,999 रुपये

ओप्पो रेनो 12 5 जी फोनची किंमत 32,999 रुपये आहे. हा मोबाईल 8 जीबी रॅमसह 256 जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो. रेनो 12 ला Astro Silver, Sunset Peach आणि Matte Brown कलरमध्ये विकत घेतले जाऊ शकते.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here