रियलमीने आपल्या Narzo सीरीजमध्ये नवीन स्मार्टफोन जोडण्याची घोषणा केली आहे. यानुसार नवीन मोबाईल Realme Narzo N61 29 जुलैला लाँच होईल. ब्रँडने टिझरमध्ये फोनची डिझाईन आणि याच्या प्रमुख स्पेसिफिकेशनची माहिती पण शेअर केली आहे. चला, पुढे कमी किंमतीमध्ये येत्या नवीन नारजो डिव्हाईस बाबत सविस्तर जाणून घेऊया.
Realme Narzo N61 लाँचची तारीख आणि लूक
- Realme Narzo N61 भारतात 29 जुलैला लाँच होत आहे. याला दुपारी 12 वाजता सादर केले जाईल.
- नवीन टिझर फोटोमध्ये Realme Narzo N61 ला हलका निळा रंग आणि पॅटर्न असणाऱ्या बॅक पॅनलसह दाखविण्यात आले आहे.
- फोनमध्ये चमकदार इफेक्ट पाहायला मिळतो. जो याला प्रीमियम लूक आणि फिल प्रदान करतो.
- डिझाईन पाहता स्मार्टफोनमध्ये फ्लॅट एज आणि मागील बाजूस LED फ्लॅशसह ड्युअल-कॅमेरा सेटअप आहे.
Realme Narzo N61 ची वैशिष्ट्ये
- Realme Narzo N61 मध्ये ArmorShell Protection दिला जाईल. ज्याबद्दल ब्रँड म्हणते की ते सर्व प्रकारच्या कठोर वातावरणापासून सहजपणे संरक्षण करतो.
- फोनला TÜV Rheinland द्वारे प्रमाणित पण करण्यात आला आहे यामुळे हा खूप मजबूत आहे.
- Realme Narzo N61 ला चार वर्षांपर्यंत अपडेट मिळणार असल्याची गोष्ट पण समोर आली आहे. हा सुरक्षा पॅच आणि Android अपग्रेडसाठी दिला जाऊ शकतो.
- Realme Narzo N61 धूळ आणि पाण्यापासून वाचणारी IP54 रेटिंगसह येईल. यात रेनवॉटर स्मार्ट टच फिचर पण मिळेल. ज्याच्या मदतीने डिस्प्ले ओला झाल्यावर पण डिव्हाईस रिस्पॉन्स देईल.
Realme C61 चे स्पेसिफिकेशन
नवीन Realme Narzo N61 जूनमध्ये लाँच झालेल्या Realme C61 चा रिब्रँड व्हर्जन असू शकतो. ज्याची माहिती तुम्ही पुढे पाहू शकता.
- डिस्प्ले: रियलमी सी 61 मध्ये 6.74 इंचाचा HD प्लस डिस्प्ले आहे. यावर 1600×720 पिक्सल रिजॉल्यूशन, वॉटरड्रॉप नॉच डिझाईन आणि 90Hz रिफ्रेश रेट देण्यात आला आहे.
- प्रोसेसर: Realme C61 मध्ये UNISOC T612 प्रोसेसर लावला आहे. हा 1.8GHz क्लॉक स्पीडवर चालतो.
- स्टोरेज: रियलमी सी 61 फोन 6 जीबी रॅम +128 जीबी इंटरनल स्टोरेजसह येतो.
- कॅमेरा: फोटोग्राफीसाठी यात 32MP लेन्स देण्यात आली आहे. तसेच, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 5MP चा लेन्स मिळते.
- बॅटरी: स्मार्टफोनमध्ये 5,000 एमएएचची मोठी बॅटरी काला सपोर्ट मिळत आहे. याला चार्ज करण्यासाठी 10W फास्ट चार्जिंगची सुविधा आहे.
- इतर: रियलमी सी 61 IP54 रेटिंगसह आहे. यात ArmorShel Protection आणि साईड माऊंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. हा 4 जी कनेक्टिव्हिटीसह येतो.















