Realme 13 Pro+ 5G भारतात झाला लाँच, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन

Realme 13 Pro सीरीज भारतात सादर करण्यात आली आहे. या सीरीज अंतर्गत Realme 13 Pro 5G आणि Realme 13 Pro+ 5G हे दोन मोबाईल फोन लाँच करण्यात आले आहेत. ड्युअल Sony LYT कॅमेरा, 12GB रॅम आणि 5,200mAh च्या बॅटरीसोबत यात AI फीचर्स देखील मिळत आहेत. सीरीजमधील सर्वात मोठ्या Realme 13 Pro Plus मॉडेलची किंमत आणि स्पेसिफिकेशनचा तपशील आपण पुढे वाचू शकता.

Realme 13 Pro+ 5G ची किंमत

  • 8GB रॅम + 256GB स्टोरेज = ₹32,999
  • 12GB रॅम + 256GB स्टोरेज = ₹34,999
  • 12GB रॅम + 512GB स्टोरेज = ₹36,999

Realme 13 Pro+ 5G फोनची किंमत 32,999 रुपयांपासून सुरू होते आणि 12 जीबी रॅमसह त्याच्या 256 जीबी व्हेरिएंटची किंमत 34,999 रुपये आणि 512 जीबी व्हेरिएंटची किंमत 36999 रुपये आहे. हा Realme स्मार्टफोन Monet Gold आणि Emerald Green रंगांमध्ये खरेदी केला जाऊ शकतो. फोनची विक्री 6 ऑगस्टपासून सुरू होणार असून कंपनीकडून 3,000 रुपयांची सूट देखील दिली जाणार आहे.

Realme 13 Pro+ 5G चा कॅमेरा

सर्वप्रथम आम्ही तुम्हाला सांगतो की Realme 13 Pro Plus 5G हा जगातील पहिला स्मार्टफोन आहे, ज्यामध्ये दोन सोनी एलवायटी लेन्स दिले गेले आहेत. हा मोबाईल फोन हायपरइमेज+ तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे आणि त्यात एआय अल्ट्रा क्लॅरिटी, एआय स्मार्ट रिमूव्हल आणि एआय ऑडिओ झूम यांसारखी आर्टिफिशियल इंटेलिजन्स फिचर्स देखील मिळत आहेत.

कॅमेरा सेन्सर्सबद्दल बोलायचे झाल्यास Realme 13 Pro+ च्या बॅक पॅनलवर एफ/1.88 अपर्चर असलेला 1/1.56 इंचाचा 50 मेगापिक्सेल सोनी एलवायटी-701 मुख्य सेन्सर दिला गेला आहे. यासोबतच मोबाईलमध्ये एफ/2.65 अपर्चर असलेली 50 मेगापिक्सेलची सोनी एलवायटी-600 पेरिस्कोप लेन्स आहे. हे दोन्ही कॅमेरा सेन्सर ओआयएस तंत्रज्ञानाने सुसज्ज आहेत.

फोनच्या ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअपमध्ये एफ/2.2 अपर्चर असलेली 8 मेगापिक्सेलची अल्ट्रा-वाईड अँगल लेन्स देण्यात आली आहे. तर सेल्फी काढणे, व्हिडिओ कॉलिंग करणे आणि रील बनवण्यासाठी Realme 13 Pro Plus 5G हा फोन 32 मेगापिक्सेलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो, जो एफ/2.45 अपर्चरवर काम करतो. हा मोबाईल 3x ऑप्टिकल झूम, 73 एमएम फोकल लेंथ, इन-सेन्सर झूम तंत्रज्ञान यांसारख्या फिचर्सना सपोर्ट करतो.

कॅमेरा सँपल

Realme 13 Pro+ 5G चे स्पेसिफिकेशन

डिस्प्ले

  • 6.7 एफएचडी+ ॲमोलेड
  • 120 हर्ट्स रिफ्रेश रेट

Realme 13 Pro+ 5G फोनमध्ये 2412 x 1080 पिक्सेल रिझोल्यूशन असलेला 6.7 इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले दिला गेला आहे. पंच-होल स्टाईल असलेली ही स्क्रीन ॲमोलेड पॅनेलवर बनवली आहे जी 120 हर्ट्झ रिफ्रेश रेटवर काम करते. Realme 13 Pro+ च्या स्क्रीनमध्ये 2000 निट्स पीक ब्राईटनेस मिळत आहे. यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे आणि स्क्रीनचे संरक्षण करण्यासाठी हा कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 7आय ने संरक्षित केला गेला आहे.

प्रोसेसर

  • स्नॅपड्रॅगन 7 एस जेन 2 (4 एनएम)
  • 2.4 गीगाहर्ट्स 8-कोर प्रोसेसर

Realme 13 Pro Plus 5G हा स्मार्टफोन 4 नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनवल्या गेलेल्या क्वालकॉम च्या स्नॅपड्रॅगन 7एस जेन 2 चिपसेट वर लाँच केला गेला आहे. या ऑक्टाकोर प्रोसेसरमध्ये 2.4 गीगाहर्ट्झ क्लॉक स्पीड असलेले चार एआरएम कोर्टेक्स-ए78 कोर आणि 1.95 गीगाहर्ट्झ क्लॉक स्पीड असलेले चार एआरएम कोर्टेक्स-ए55 कोर आहेत. तर ग्राफिक्ससाठी हा Realme स्मार्टफोन ॲड्रेनो 710 जीपीयू ला सपोर्ट करतो.

91 मोबाईलच्या टेस्टिंग टीमने जेंव्हा फोनचा परफॉर्मन्स तपासला तेव्हा त्याला 617481 AnTuTu स्कोर मिळाला आहे. दुसरीकडे या मोबाईलला गीकबेंच सिंगल-कोरमध्ये 916 आणि मल्टी-कोरमध्ये 2815 गुण मिळाले आहेत. तर टेस्टिंग दरम्यान या डिव्हाईसचा एआय स्कोअर 471 होता.

ओएस

  • रिअलमी यूआय 5.0
  • अँड्रॉईड 14

हा नवीन रिअलमी स्मार्टफोन अँड्रॉईड च्या नवीनतम ऑपरेटिंग सिस्टम अँड्रॉईड 14 वर लाँच करण्यात आला आहे, जो ब्रँडच्या स्वतःच्या रिअलमी यूआय 5.0 सोबत मिळून काम करतो. कंपनी आपल्या या फोनला 2 वर्षांच्या ओएस अपडेट्स आणि 3 वर्षांच्या सिक्युरिटी अपडेट्ससह आणत आहे. म्हणजेच हा मोबाईल अँड्रॉईड 16 साठी आधीच तयार आहे.

मेमरी

  • 12GB LPDDR4X रॅम
  • 512GB यूएफएस 3.1 स्टोरेज

Realme 13 Pro+ 5G फोन भारतीय बाजारात तीन मेमरी व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. त्याच्या बेस मॉडेलमध्ये 8 जीबी रॅमसह 256 जीबी स्टोरेज आहे, तर त्याचे इतर दोन प्रकार 12 जीबी रॅमसह 256 जीबी आणि 512 जीबी स्टोरेजला सपोर्ट करतात.

बॅटरी

  • 5,200 एमएएच बॅटरी
  • 80 वॉट सुपरवूक चार्ज

Realme 13 Pro+ 5G फोन पॉवर बॅकअपसाठी मजबूत 5,200 एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो. कंपनीचा दावा आहे की, 1600 वेळा चार्ज केल्यानंतरच बॅटरीचे आरोग्य 80 टक्क्यांहून अधिक राहील. तर ही मोठी बॅटरी फास्ट चार्ज करण्यासाठी स्मार्टफोनमध्ये 80 वॉट सुपरवूक फास्ट चार्जिंग तंत्रज्ञान आहे.

91 मोबाईलच्या टेस्टिंग टीमने या मोबाईलवर 30 मिनिटे युट्यूब चालवले तेव्हा बॅटरी 5 टक्क्यांनी कमी झाली. तर अल्ट्रा एचडीआर मध्ये अर्धा तास म्हणजेच 30 मिनिटे BGMI गेम खेळल्यामुळे 8 टक्के बॅटरी खर्च झाली.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here