मुकेश अंबानींच्या मालकीची टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांना एक अप्रतिम भेट दिली आहे. वास्तविक, कंपनीने आपली Jio AirFiber फ्रीडम ऑफर आणखी काही दिवसांसाठी वाढवली आहे. म्हणजेच जर तुम्ही एअरफायबर चे कनेक्शन घेण्याचा विचार करत असाल, तर ही योग्य वेळ म्हणता येऊ शकतो. त्याचवेळी, खास गोष्ट म्हणजे ऑफरमध्ये जिओ एअरफायबर चे कनेक्शन घेणाऱ्या ग्राहकांना कंपनी 3599 रुपयांचा मोबाईल प्रीपेड प्लॅन पूर्णपणे मोफत देत आहे. याबाबतची माहिती कंपनीने आपल्या साईटवर दिली आहे.
वेबसाईटवर लाईव्ह आहे ऑफर
वेबसाईटनुसार जर तुम्ही एअरफायबर चे नवीन कनेक्शन बुक केले, तर तुम्हाला 3599 रुपयांच्या 365 दिवस चालणाऱ्या प्लॅनचे मोफत सबस्क्रिप्शन मिळेल. या ऑफरसाठी तुम्हाला तुमच्या माहितीसोबत 50 रुपयांची रिफंडेबल बुकिंग रक्कम भरावी लागेल. विशेष बाब म्हणजे बुकिंग रकमेच्या बदल्यात कंपनी ग्राहकांना मोफत डेटा पॅक देखील देत आहे.
इंस्टॉलेशन देखील मिळेल मोफत
एअरफायबर ऑफरमध्ये ग्राहकांना 2121 रुपयांचा प्लॅन देखील ऑफर केला जात आहे. 30 टक्के डिस्काऊंटसह उपलब्ध असलेल्या या प्लॅनची वैधता 3 महिन्यांची आहे. तसेच, जिओ एअरफायबर कनेक्शनसोबत ग्राहकांना विनामूल्य इंस्टॉलेशन देखील मिळेल, कंपनीकडून ज्याची किंमत 1,000 रुपये आकारली जाते.
जिओ एअरफायबर सेवेमध्ये मिळणारे फायदे
कंपनीकडून जिओ एअरफायबर सेवेमध्ये 800 हून अधिक टीव्ही चॅनेलचे मोफत ॲक्सेस दिले जाते. त्याचवेळी, प्लॅनमध्ये तुम्हाला 1Gbps पर्यंतचा स्पीड दिला जातो. एवढेच नाही तर प्लॅनमध्ये नेटफ्लिक्स, जिओ सिनेमा, सोनी लिव्ह, झी 5 आणि डिस्ने+ हॉटस्टारसह जवळपास 17 ओटीटी ॲप्सचे मोफत सबस्क्रिप्शन देखील मिळत आहे.
3599 रुपयांच्या प्लॅनचे फायदे
जर आपण 3,599 रुपयांच्या प्लॅनबद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये कंपनीकडून 365 दिवसांची वैधता देण्यात येत आहे. त्याचवेळी, कंपनी इंटरनेट वापरण्यासाठी प्लॅनमध्ये दररोज 2.5 जीबी डेटा देखील देत आहे.
एवढेच नाही तर प्लॅनमध्ये अमर्यादित 5G डेटा देखील दिला जात आहे. हा प्लॅन देशभरातील सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 मोफत एसएमएसचा लाभ देईल.














