ॲमेझॉनवर 4500 रुपयांनी स्वस्त मिळत आहे हा डिव्हाईस, भिंतीवर बनवता येईल 120 इंचाचा टीव्ही

घरात थिएटरसारखा अनुभव घेण्याची इच्छा असेल तर अशा ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. खरं तर, आपल्या अनोख्या उत्पादनांसाठी प्रसिद्ध असलेल्या पोर्ट्रोनिक्स कंपनीकडून एक नवीन पिको 13 प्रोजेक्टर लाँच करण्यात आला आहे. जो लाँच होताच ॲमेझॉनच्या सेलवर 4,500 रुपयांनी स्वस्त मिळत आहे. यात 4K रिझोल्यूशन पर्यंतचे व्हिडिओ आऊटपुट क्षमता आहे आणि हा 3,500 लुमेन ब्राईटनेस लॅम्प ने सुसज्ज आहे. एवढेच नाही तर कंपनीचा दावा आहे की तो 120 इंचापर्यंतच्या आकारात व्हिज्युअल प्रोजेक्ट करू शकतो. चला, सविस्तरपणे जाणून घेऊया की त्याची किंमत किती आहे आणि त्यात विशेष काय आहे.

पोर्ट्रोनिक्स पिको 13 ची किंमत आणि विक्रीचा तपशील

पोर्ट्रोनिक्स पिको 13 हा कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर 31,499 रुपयांच्या सुरूवातीच्या किमतीत उपलब्ध आहे. पण ॲमेझॉन वर सुरू असलेल्या सेलमध्ये हा प्रोजेक्टर 26,999 रुपयांच्या किंमतीसोबत सूचीबद्ध करण्यात आला आहे. म्हणजेच त्याला 4,500 रुपयांनी कमी किमतीत खरेदी करता येऊ शकते. याशिवाय तुम्हाला सांगतो की कंपनी यावर 12 महिन्यांची वॉरंटी देखील देत आहे.

पोर्ट्रोनिक्स पिको 13 ची वैशिष्ट्ये

पिको 13 मध्ये एचडीएमआय पोर्ट आणि युएसबी पोर्ट देखील आहे. चार्जिंगसाठी यात एक टाईप-सी पोर्ट देखील देण्यात आला आहे. याशिवाय यामध्ये 120 इंचांपर्यंतची स्क्रीन तयार करता येते. हा प्रोजेक्टर रिचार्जेबल, डीएलपी-सपोर्टेड – पिको 13 प्रोजेक्टर त्याच्या ब्राईट 3500 लुमेनसह अल्ट्रा एचडी रिझोल्यूशन पर्यंत व्हायब्रेट व्हिज्युअल दाखवतो. हा वापरकर्त्याला त्याचा आवडता कंटेन्ट भिंतीवर 1.3 मीटरपासून ते 3.0 मीटर अंतरापर्यंत पाहण्याची संधी देत आहे.
तुम्हाला सांगतो की प्रोजेक्टरसोबत वेगळे स्पीकर बसवण्याची गरज नाही कारण यामध्ये स्पीकर देखील बसविण्यात आले आहेत. तर, शक्तिशाली आवाजासाठी पिको 13 मध्ये बिल्ट-इन 10 वॉटचे स्पीकर्स देखील लावण्यात आले आहेत. तथापि, अधिक आवाज हवा असेल, तर प्रोटेक्टरमध्ये देण्यात आलेल्या एयुएक्स पोर्ट किंवा बिल्ट-इन ब्लूटूथद्वारे वेगळा स्पीकर जोडण्याचा पर्याय देखील मिळत आहे.

प्रोजेक्टरमध्ये मिळतील अनेक प्री-इंस्टॉल ॲप्स

तुम्हाला सांगतो की हा एक स्मार्ट प्रोजेक्टर आहे जो अँड्राईड ओएस वर चालतो आणि यात नेटफ्लिक्स, प्राईम व्हिडिओ, डिस्ने+ हॉटस्टार आणि इत्यादी स्ट्रीमिंग ॲप्स आधीच इंस्टॉल केलेले मिळत आहेत. याशिवाय यामध्ये स्क्रीन मिररिंगची सुविधाही उपलब्ध आहे, ज्यामधून वापरकर्ते त्यांच्या स्मार्टफोनचा कंटेन्ट प्रोजेक्टरच्या स्क्रीनवर पाहू शकतात.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here