5,000mAh बॅटरी असलेला स्वस्त Realme Q2i झाला लॉन्च, आवडला का तुम्हाला?

Realme Q2, Realme Q2 Pro आणि Realme Q2i चीन मध्ये Realme Q सीरीज मध्ये लॉन्च केले गेले आहेत. तिन्ही फोन 5 जी सपोर्ट, मोठी बॅटरी आणि मीडियाटेक प्रोसेसर सह सादर केले गेले आहेत. या तिन्ही मध्ये Realme Q2 आणि Realme Q2 प्रो काहीसे एक सारखे आहेत. तर Realme Q2i मध्ये एक वेगळी डिजाइन देण्यात आला आहे. नॉच सह येणाऱ्या Realme Q2i एक बजेट कॅटेगरीचा फोन आहे. याची डिजाइन कंपनीने लॉन्च केलेल्या दुसऱ्या बजेट फोन्स सारखीच आहे. चला जाणून घेऊया रियलमी क्यू2i बद्दल सर्व माहिती.

फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

फोन मध्ये सेल्फी कॅमेऱ्यासाठी पुढच्याबाजूला एक नॉच आहे, तर मागे ट्रिपल कॅमेरा सेटअप चौकोनी आकारात आहे. तसेच डिवाइस मध्ये वॉल्यूम रॉकर आणि पावर बटन उजव्या पॅनल वर आहे तसेच डाव्या पॅनल वर सिम स्लॉट देण्यात आला आहे. फोन मध्ये 20:9 आस्पेक्ट रेश्यो सह मोठा 6.5-इंचाचा एचडी+ (720×1,600 पिक्सल) डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच फोन मध्ये 88.7 टक्के स्क्रीन टू बॉडी रेश्यो आहे.

फोटो आणि वीडियो कॅप्चर करण्यासाठी Realme Q2i मध्ये मागे तीन कॅमेरे देण्यात आले आहेत. सेटअप मध्ये अपर्चर f/2.2 सह 13-मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर, अपर्चर f/2.4 सह 2-मेगापिक्सलचा मॅक्रो सेंसर आणि अपर्चर f/2.4 सह 2-मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर आहे. तसेच फ्रंटला अपर्चर f/2.0 सह 8-मेगापिक्सलचा सेंसर आहे, जो नॉच मध्ये आहे.

कनेक्टिविटी ऑप्शनसाठी फोन मध्ये 5G, 4G LTE, डुअल-बॅंड वाई-फाई, ब्लूटूथ v5.0, GPS / A-GPS, Glonass, 3.5 मिमी हेडफोन जॅक आहे आणि चार्जिंगसाठी USB टाइप- C पोर्टचा समावेश आहे. फोन मध्ये पावर बॅकअपसाठी 5,000mAh च्या बॅटरी सह 18W फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे.

रियलमीच्या स्वस्त 5जी फोन Realme Q2i मध्ये MediaTek Dimensity 720 SoC आहे. MediaTek डाइमेंशन 700 सीरीजचा उद्देश रोजच्या वापरातील 5जी स्मार्टफोन्स मध्ये चांगला अनुभव देण्याचा आहे. हा चिपसेट 5G मॉडेम सह पूर्णपणे एका छोट्या 7nm चिप मध्ये एकीकृत केला गेला आहे. तसेच यात 4GB पर्यंत LPDDR4X रॅम आणि 128GB पर्यंतची UFS 2.1 स्टोरेज देण्यात आली आहे.

किंमत

Realme Q2i ची किंमत CNY 998 (जवळपास 10,840) आहे. स्मार्टफोन चीन मध्ये 19 ऑक्टोबर पासून विक्रीसाठी सादर केला जाईल. तसेच Realme Q2 च्या 4GB RAM आणि 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत CNY 1,299 (जवळपास 14,000 रुपये) आणि 6GB + 128GB वेरिएंटची किंमत CNY 1,399 (जवळपास 15,200 रुपये) आहे. तर Realme Q2 Pro च्या 8GB + 128GB वेरिएंटची किंमत CNY 1,799 (जवळपास 19,500 रुपये) आणि 8GB + 256GB वेरिएंटची किंमत CNY 1,999 (जवळपास 21,700 रुपये) आहे.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here