हि नॉन-चीनी कंपनी घेऊन येत आहे 600MP कॅमेरा असलेला स्मार्टफोन!, बदलेल का फोन्सचे मार्केट

साल 2020 संपत आला आहे आणि दरवर्षी प्रमाणेच यावर्षी पण अनेक स्मार्टफोन लॉन्च झाले आहेत. यावर्षी लॉन्च झालेले फोन्स पाहता सर्व कंपन्यांनी सर्वात जास्त लक्ष आपल्या स्मार्टफोन्सच्या कॅमेऱ्यावर दिले आहे. यावर्षी लॉन्च झालेल्या स्माटफोन्स मध्ये 48 मेगापिक्सल पासून 108 मेगापिक्सल पर्यंतचे कॅमेरे दिसले होते. आता समोर आलेल्या माहितीनुसार टेक विश्वातील दिग्गज कंपनी सॅमसंग ISOCELL 600 मेगापिक्सलच्या सेंसर वर काम करत आहे. बोलले जात आहे कि सॅमसंगचा 600 मेगापिक्सल असलेला कॅमेरा सध्या डिवेलपिंग फेज मध्ये आहे.

समोर आई एक रिपोर्ट मध्ये खुलासा झाला होता कि 600 मेगापिक्सलचा कॅमेरा 4K आणि 8K विडियो रिकॉर्डिंग मध्ये झूम शॉट्सचे डीटेल कायम ठेवण्याचे काम करू शकतो. पॉप्युलर टिप्स्टर आइस यूनिवर्सने एक ट्वीट करून माहिती दिली आहे कि सॅमसंग सध्या 600 मेगापिक्सलच्या सेंसर वर काम करत आहे आणि याचा आकार 1/0.57 इंच असू शकतो.

साइज पाहता हा कॅमेरा सेंसर आतापर्यंतच्या कोणत्याही स्मार्टफोन सेंसर पेक्षा मोठा शकतो. आतापर्यंत सर्वात मोठा सेंसर हुवावेने आपल्या P40 Pro+ स्मार्टफोन मध्ये 1/1.28 इंचाचा दिला आहे. लीक्स्टर नुसार कंपनी फोनच्या रियर पॅनल वर 600MP सेंसरमुळे येणारा कॅमेरा बंप कमी करण्यावर काम करत आहे. आता हा रियर पॅनल वर दिल्यावर 22mm चा होतो. हा स्मार्टफोनच्या बॅक पॅनल वर 12 टक्के भाग घेतो.

600 मेगापिक्सल असलेला सेंसर कंपनी कधी लॉन्च करेल याबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. पण हे निश्चित आहे कि कागदावरून बाजारात यायला थोडा वेळ लागले. सध्या सॅमसंग आपल्या गॅलेक्सी नोट 20 अल्ट्रा आणि गॅलेक्सी S20 अल्ट्रा स्मार्टफोन मध्ये 108 मेगापिक्सल कॅमेरा देत आहे.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here