Airtel युजर्ससाठी खूप मोठी बातमी समोर आली आहे. भारतीय मोबाईल सेवा ऑपरेटर कंपनी Airtel नं घोषणा करून सांगितलं आहे की या महिन्यात म्हणजे ऑगस्टमध्ये कंपनी आपली 5G Service सुरु करणार आहे. काही दिवसांमध्ये कंपनीची 5G सर्व्हिस सामान्य युजर्ससाठी अधिकृतपणे उपलब्ध होईल. भारतात 5G सर्व्हिसच्या विकास आणि विस्तारासाठी कंपनीनं Ericssion, Nokia आणि Samsung सह भागेदारी केली आहे.
याआधी देखील Airtel स्पष्ट केलं आहे की संपूर्ण देशात ते आपली 5G सर्व्हिस लाँच करतील आणि यासाठी Ericssion, Nokia आणि Samsung या तिन्ही कंपन्या इन्फ्रास्ट्रक्चर तयार करतील. राहिला प्रश्न 5G सर्व्हिसच्या लाँचचा, तर 15 ऑगस्टला पंतप्रधानांद्वारे 5G सर्व्हिसच्या लाँचची घोषणा केली जाऊ शकते, अशी चर्चा आहे आणि त्याचबरोबर एयरटेल आणि जियो आपल्या सर्विसची घोषणा करू शकतात.
Airtel 5G Service
भारती एयरटेलने अधिकृत माहिती देत सांगितलं आहे की कंपनी या महिन्यात म्हणजे ऑगस्ट 2022 पासून भारतात आपली 5जी सर्व्हिस सुरु करणार आहे. 5G network साठी एयरटेलनं Ericsson, Nokia आणि Samsung सारख्या तीन बड्या टेक कंपन्यांशी भागेदारी केली आहे. या तीन कंपन्यांसोबत मिळून एयरटेल संपूर्ण भारतात आपल्या 5जी सर्व्हिसचा विस्तार करेल तसेच 5जी नेटर्वक व 5जी इंटरनेट देईल.
Airtel 5G Bands
5G Spectrum Auction मध्ये देखील Airtel नं Jio ला जोरदार टक्कर दिली आहे. या लिलावात एयरटेलनं 43,084 कोटी रुपयांच्या 19867.8 MHZ spectrum चं संपादन केलं आहे. Department of Telecom नं आयोजित केलेल्या या स्पेक्ट्रम ऑक्शनमध्ये एयरटेलनं 900 MHz, 1800 MHz, 2100 MHz, 3300 MHz आणि 26 GHz frequency 5G Spectrum मिळवले आहेत.
Airtel 5G Sim
5G स्मार्टफोन्सनी भारतात जम बसवला आहे आणि 12,000 रुपयांपर्यंतच्या बजेटमध्ये सहज 5G हँडसेट मिळतात. 5G Network देखील काही दिवसांत सक्रिय होईल आणि आता फक्त 5G Sim ची प्रतीक्षा आहे. जर तुम्ही देखील एयरटेल युजर असाल तर एयरटेलच्या 5जी सर्व्हिसचा लाभ घेण्यासाठी वेगळ्या 5जी सिमची आवश्यकता असणार नाही. वर्तमान 4G Airtel Sim वर आपोआप 5G Network चा वापर करता येईल.
Airtel 5G Plan
फक्त एयरटेलच नाही तर रिलायन्स जियो आणि विआयसह कोणत्याही टेलीकॉम ऑपरेटरनं आतापर्यंत आपल्या 5G recharge plans बद्दल कोणतीही माहिती दिली नाही. भारतात मिळणार 5G Plan जागतिक बाजाराच्या तुलनेत स्वस्त असतील. परंतु भारतीय मोबाईल युजर्सना 5G Service साठी 4G च्या तुलनेत जास्त पैसे द्यावे लागू शकतात. तसेच अशी चर्चा आहे की सुरुवातीला कंपनी फक्त आपल्या प्रीमियम युजर्सना 5जी नेटवर्क देईल आणि हळूहळू साल 2022 च्या अखेरपर्यंत किंवा 2023 च्या सुरुवातीला अन्य एयरटेल ग्राहकांना ही सेवा मिळेल.
