Home बातम्या Airtel फ्री मध्ये देत आहे 5GB डेटा, जाणून घ्या कशाप्रकारे या ऑफरचा लाभ

Airtel फ्री मध्ये देत आहे 5GB डेटा, जाणून घ्या कशाप्रकारे या ऑफरचा लाभ

टेलीकॉम कंपन्या अनेकदा आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नव-नवीन ऑफर सादर करत असते. या ऑफर मध्ये अनेकदा फ्री डेटा आणि कॉलिंग सारख्या आकर्षक ऑफर दिल्या जातात. त्यानुसार Airtel ने आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन ऑफर सादर केली आहे त्याअंतर्गत 5जीबी डेटा फ्री मध्ये दिला जात आहे. मिळणाऱ्या 5जीबी डेटाचा वापर नवीन ग्राहक किंवा जुने ग्राहक वापरू शकतात जे 3जी वरून 4जी मध्ये अपग्रेड होते आहेत. चला जाणून घेऊया या ऑफर बाबत सर्वकाही.

या ऑफर नुसार एयरटेल नवीन 4जी ग्राहकांना 5जीबी डेटा मोफत देत आहे जो ‘एयरटेल थँक्स’ ऍप डाउनलोड केल्यावरच मिळेल. ग्राहकांना 1GB चे पाच कुपन मिळतील. यातील पहिला एक जीबी डेटा Airtel Thanks ऍप डाउनलोड केल्यावर मिळेल, पण या ऑफरचा फायदा त्याच लोकांना मिळेल जे पहिल्यांदा एयरटेल थँक्स ऍप डाउनलोड करत आहेत.

तसेच याचा फायदा त्या लोकांना पण मिळेल जे एयरटेलचा नवीन सिम कार्ड घेत आहेत किंवा आपला 3जी सिम कार्ड 4जी मध्ये अपग्रेड करत आहेत. रिपोर्टनुसार Airtel ची हि ऑफर नवीन 4जी सिम आणि 4जी अपग्रेड फ्री डेटा कुपनच्या नावाने सादर केली गेली आहे. वर सांगितल्याप्रमाणे हा फ्री डेटा एक-एक जीबीच्या पाच कुपनच्या माध्यमातून मिळेल.

कुपनचा वापर करण्यासाठी ग्राहकांना एयरटेल थँक्स ऍप वर ‘माय कुपन’ सेक्शन मध्ये आपल्या कुपन यूज वर जावे लागेल. प्रत्येक 1GB कुपनचा क्रेडिट झालेल्या दिवसांपासून 90 दिवसांच्या आत वापर करता येईल आणि हा तीन दिवस चालू राहील. तसेच एका ग्राहकाला फक्त एक विशेष मोबाईल नंबरचा वापर करून या ऑफरचा लाभ घेऊ शकतात. कथितरित्या, जर ग्राहक 5GB मोफत डेटा ऑफरसाठी पात्र असेल तर तो 2GB मोफत डेटा ऑफरसाठी पात्र असणार नाही, जो सध्या टेलीकॉम दिग्गज Airtel थँक्स ऍप वर पहिल्यांदा रजिस्ट्रेशन वर दिला जात आहे.

सोर्स