Home बातम्या डाउनलोडिंग स्पीडच्या बाबतीत Jio च्या पुढे आहे Airtel, जाणून घ्या इतर कंपन्यांची परिस्थिती

डाउनलोडिंग स्पीडच्या बाबतीत Jio च्या पुढे आहे Airtel, जाणून घ्या इतर कंपन्यांची परिस्थिती

airtel च्या ऑफिस समोरील व्यक्ती

भारतात जवळपास सर्व टेलिकॉम प्रोवाइडर्स 4G इंटरनेट सर्विस देत आहेत, पण इंटरनेट स्पीडच्या बाबतीत सर्व कमजोर वाटतात. एक रिपोर्ट समोर आला आहे ज्यात भारतात Airtel सर्वात वेगवान 4G डाउनलोड स्पीड देत आहे, तर रिलायंस जियोचा नंबर एयरटेल नंतर येतो. मोबाईल क्वॉलिटी मेजरमेंट कंपनी टुटेलाच्या रिपोर्ट मध्ये याचा उल्लेख केला गेला आहे. रिपोर्ट मध्ये दावा केला गेला आहे यात भारतातील सर्व टेलिकॉम ऑपरेटर्स द्वारा दिली जाणारी सर्विस टेस्ट केली गेली आहे.

ऑगस्ट आणि ऑक्टोबर 2019 दरम्यान गोळा केलेल्या आकड्यांच्या आधारावर टुटेलाने नोव्हेंबर 2019 महिन्यासाठी मोबाईल एक्सपीरियन्स रिपोर्ट सादर केला आहे. टुटेलाने नेटवर्कची गुणवत्ता आणि वेगवेगळ्या दूरसंचार ऑपरेटर्सची कामगिरीचे मूल्यमापन करण्यासाठी वेगवेगळे मॅट्रिक्स प्रकाशित केले आहेत.

रिपोर्टच्या हाइलाइट्स पाहता यात टेलिकॉम ऑपरेटर्सचा स्पीड पण सांगण्यात आला आहे. याबाबतीत भारती एयरटेलकडे 7.1 एमबीपीएस डाउनलोड स्पीड आणि 3.3 एमबीपीएस अपलोड स्पीड आहे ज्यामुळे कंपनी नंबर 1 बनते. तर वोडाफोन 6.3 एमबीपीएस डाउनलोड स्पीड आणि 3.6 एमबीपीएस अपलोड स्पीड सह दुसऱ्या नंबर वर आहे. आइडियाचा 5.5 एमबीपीएस डाउनलोड स्पीड आणि 3.2 एमबीपीएस अपलोड स्पीड होता. Jio 4.9 एमबीपीएस डाउनलोड स्पीड, आणि 3.1 एमबीपीएस अपलोड स्पीडमुळे इथे टॉप वर राहू शकली नाही.

टुटेला रिपोर्टने हे पण सांगितले कि कोणत्या टेलीकॉम ऑपरेटरकडे किती टक्के 4 जी नेटवर्क आहे. याबाबतीत रिलायंस जियो कडे 4 जी अंतर्गत 99.6% नेटवर्क आहे जो सर्वाधिक 4 जी नेटवर्क आहे. दुसऱ्या नंबर वर भारती एयरटेल आहे, ज्यांच्याकडे 86.6% 4 जी नेटवर्क आणि 13.4% 3 जी नेटवर्क आहे. वोडाफोन कडे 71.5% 4 जी मार्कअप आहे, तर बीएसएनएल कडे सर्वात खराब 4 जी कॉम्पोजिशन आहे, ज्यात फक्त 9.6% नेटवर्क 4 जी आणि बाकी 90.4% नेटवर्क 3 जी आहे.