Home बातम्या याबाबतीत Jio पेक्षा पुढे आहे Airtel, जाणून घ्या इतर कंपन्यांचे हाल

याबाबतीत Jio पेक्षा पुढे आहे Airtel, जाणून घ्या इतर कंपन्यांचे हाल

टेलीकॉम सेक्टर मध्ये सध्या रिलायंस जियोला एयरटेलच योग्य टक्कर देत आहे. एयरटेल बऱ्याच दिवसांपासून नवीन प्लानच्या जीवावर जियोला मागे टाकण्याचा प्रयत्न करत आहे. आता ओपन सिग्नलचा एक रिपोर्ट समोर आला आहे ज्यात सांगण्यात आले आहे कि 4G कनेक्टिविटी मध्ये एयरटेलने गेल्यावर्षीच्या तुलनेत खूप प्रगती केली आहे आणि जियोच्या जवळ पोहचली आहे.

ओपन सिग्नलने जारी केलेल्या ऑक्टोबर 2019 च्या मोबाईल एक्सपीरियंस रिपोर्ट मध्ये एयरटेलची 4G उपलब्धता 89.2% दाखवण्यात आली गया आहे. जी मागील पिछली रिपोर्टपेक्षा 3.6% जास्त आहे.

याबाबतीती आहे जियोच्या पुढे

ओपन सिग्नलने 1 जून 2019 पासून 29 ऑगस्ट 2019 दरम्यान 4G कनेक्टिविटी आणि तिच्या उप्लब्धतेबद्दल डेटा कलेक्ट केला. याकाळात एयरटेलचा सरासरी 4G डाउनलोड स्पीड 9.6Mbps आहे. तर जियोचा 4G डाउनलोड स्पीड 6.7Mbps सांगण्यात आला आहे. तसेच वोडाफोनचा स्पीड 7.9Mbps आहे.

4G नेटवर्क उप्लब्धतेमध्ये जियो पुढे

हालांकि, 4G नेटवर्क उप्लब्धतेमध्ये जियो पुढे आहे. जियोची 4G नेटवर्क उपलब्धता 97.8% आहे. अनेक बाबतीत एयरटेल आणि वोडाफोन आइडियाने जियोला मागे टाकले आहे. पण 4G च्या बाबतीत अजूनही जियोचे राज्य आहे.

अपलोड स्पीड मध्ये आइडिया पुढे

अपलोड स्पीड पाहता यात 3.2Mbps स्पीडसह आइडिया पहिल्या क्रमांकावर आहे. वोडाफोनचा अपलोड स्पीड 3.1 आणि एयरटेलचा अपलोड स्पीड 2.4Mbps आहे. तर अपलोड स्पीडच्या बाबतीत जियो या दोन्ही कंपन्यांच्या मागे आहे. रिपोर्ट मध्ये 4G नेटवर्क वर जियोचा अपलोड स्पीड 2.1Mbps आहे.