स्पॅम कॉल आणि मेसेजमुळे त्रासलेल्या ग्राहकांसाठी भारती एअरटेलने एक खास भेट दिली आहे. तथापि, एअरटेलने देऊ केलेल्या या गिफ्टचा लाभ फक्त एअरटेल ग्राहकांनाच मिळणार आहे. आम्ही ज्या गिफ्टबद्दल बोलत आहोत ते प्रमुख दूरसंचार कंपनी एअरटेलकडून ऑफर करण्यात आलेले एक विशेष टूल आहे जे स्पॅम कॉल आणि मॅसेजपासून संरक्षण करण्यासाठी बनविण्यात आले आहे. एअरटेलने याला स्पॅम डिटेक्शन सोल्यूशन असे नाव दिले आहे, जे ग्राहकांना रिअल-टाईम संरक्षणासह स्पॅम ॲक्टिव्हिटी पासून स्वयंचलित संरक्षण देईल.
एअरटेल स्पॅम डिटेक्शन टूल कसे कार्य करेल?
सर्वप्रथम, तुम्हाला सांगतो की एअरटेल स्पॅम डिटेक्शन टूलसाठी ग्राहकांना कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही. होय, हे सर्व एअरटेल ग्राहकांसाठी विनामूल्य आहे आणि सर्व ग्राहकांच्या नंबरवर स्वयंचलितपणे सक्रिय केले जाईल. हे टूल एआय टूल कॉल फ्रिक्वेन्सी, कालावधी आणि इतर पॅटर्न, आणि संभाव्य हल्ले ओळखून ग्राहकांना स्पॅम ॲक्टिव्हिटी पासून सतर्क करेल.
यासोबतच हे टूल स्पॅम कॉल्स आणि मेसेजसह फिशिंग हल्ल्यांपासूनही ग्राहकांना वाचवते. हे टूल मेसेजमध्ये आढळलेली युआरएल स्कॅन करून ग्राहकांना त्या लिंकवर क्लिक करण्यापासून वाचवत आहे. आम्ही हे आमच्या एअरटेल नंबरवर तपासले, ज्याचा निकाल तुम्ही खालील स्क्रीनशॉटमध्ये पाहू शकता. जेव्हा एखादा कॉल येतो तेव्हा स्क्रीनवर तो आपोआप ओळखला जातो आणि हा स्पॅम कॉल असल्याचे दिसते.
AI ने सुसज्ज असलेले एअरटेलकडे आहे स्पॅम डिटेक्शन टूल
तुम्हाला सांगतो की भारतात फक्त एअरटेलनेच हे खास टूल आणले आहे. तर, कंपनीने सांगितले की हे टूल वारंवार आयएमईआय बदलणाऱ्या धोकादायक स्कॅमरपासून देखील ग्राहकांचे संरक्षण करते. याशिवाय, कंपनी आपल्या प्रगत स्पॅम संरक्षणासह ग्राहकांना सुरक्षित आणि पहिल्या पेक्षा अधिक उत्तम मोबाईल अनुभव देऊ इच्छिते.
एअरटेल स्पॅम डिटेक्शन टूलची 4 वैशिष्ट्ये
1. एअरटेल स्पॅम डिटेक्शन टूल ड्युअल लेयर प्रोटेक्शनसह बनवलेले आहे, जे लेव्हलवर काम करते.
2. यापैकी एक नेटवर्क लेव्हल आणि दुसरा आयटी सिस्टीम वर आधारित आहे. एअरटेल नेटवर्कचे सर्व कॉल संदेश या टूलद्वारे पूर्ण होतात.
3. हे टूल 2 मिली सेकंदमध्ये 1.5 अब्ज संदेश आणि 2.5 अब्ज कॉल्सवर प्रोसेस करून ग्राहकांचे स्पॅमपासून संरक्षण करते.
4. हे टूल दररोज 100 दशलक्ष स्पॅम कॉल आणि 3 दशलक्ष स्पॅम संदेश ओळखू शकते.
