Home बातम्या Airtel यूजर्सना मोफत देत आहे 1GB डेटा, जाणून घ्या ऑफर

Airtel यूजर्सना मोफत देत आहे 1GB डेटा, जाणून घ्या ऑफर

टेलीकॉम सेक्टर मध्ये नंबर वन असलेल्या Jio ला आव्हान देण्यासाठी Airtel ने एक खास ऑफर सादर केली आहे. या ऑफर अंतर्गत एयरटेल आपल्या ग्राहकांना 3 दिवसांसाठी अगदी मोफत 1जीबी हाई-स्पीड डेटा देत आहे. हा लाभ काही निवडक यूजर्सना दिला जात आहे. एयरटेलच्य आधी जियो अश्याप्रकारे आपल्या प्रीपेड सब्सक्राइबर्सना डेटा देत होती. गेल्या महिन्यात रिपोर्ट समोर आला होता कि जियो आपल्या काही निवडक यूजर्सना 2जीबी डेटा देत आहे.

OnlyTech नावाच्या वेबसाइटने या ऑफरची माहिती सर्वात आधी आहे. रिपोर्टनुसार एका एयरटेल सब्सक्राइबरने 48 रुपयांचा डेटा पॅक रीचार्ज केला, ज्यात त्याला एकूण 4 जीबी डेटा मिळाला. डेटा प्लाननुसार, त्याला या रीचार्ज नंतर 3 जीबी डेटा मिळणार होता, पण याला 1 जीबी डेटा अतिरिक्त मिळाला जो अगदी मोफत होता. कंपनीने यूजरला मेसेज करून याची माहिती दिली आहे.

तसेच असे बोलले जात आहे कि 49 रुपयांच्या स्मार्ट पॅक मध्ये पण 1 जीबी फ्री डेटा एयरटेल द्वारे दिला जात आहे. 49 रुपयांच्या प्लान बद्दल बोलायचे तर यात 100 एमबी डेटा आणि 38.52रुपयांचा टॉक-टाइम मिळतो. पण आता या ऑफर मध्ये यूजर्सना 1 जीबी फ्री डेटा देण्यात आला आहे, ज्याची वैधता पण 3 तीन दिवस आहे.

एयरटेलने काही दिवसांपूर्वी आपला ट्रूली अनलिमिटेड ऍन्युअल पॅक म्हणजे 2,398 रुपयांचा प्लान बंद केला आहे. एयरटेलने गेल्या वर्षी डिसेंबर मध्ये 2,398 प्रीपेड रिचार्ज मध्ये बदल केले होते. या बदलानंतर प्लान मध्ये यूजर्सना 1.5जीबी डेटा रोज या हिशोबाने 500जीबी डेटा 365 दिवसांसाठी दिला जात होता. तसेच प्लान अनलिमिटेड कॉलिंग पण ऑफर करत होता. या प्लान मध्ये यूजर्सना एयरटेल Xstream Premium आणि Wynk Music चे सब्सक्रिप्शन, फ्री हलोट्यून्स आणि FASTAG वर 150 रुपयांचा कॅशबॅक पण मिळत होता.

2,498 रुपयांचा प्लान

एयरटेलच्या 2,498 रुपयांच्या प्लान बद्दल बोलायचे तर या प्लान मध्ये यूजर्ससाठी सर्व नेटवर्क वर कॉलिंग मोफत असेल. या प्लान मध्ये यूजर्सना रोज 2जीबी डेटा (एकूण 730GB डेटा) दिला जात आहे. या प्लानची वैधता 365 दिवस आहे. सोबत ग्राहकांना रोज 100 एसएमएस पण मिळतात.

सोर्स