Home बातम्या एयरटेल ने सादर केला 219 रुपयांचा प्लान, रोज मिळेल 1.4जीबी 4जी डाटा आणि अनलिमिटेड वॉयस कॉल सह कॉलर ट्यून मोफत

एयरटेल ने सादर केला 219 रुपयांचा प्लान, रोज मिळेल 1.4जीबी 4जी डाटा आणि अनलिमिटेड वॉयस कॉल सह कॉलर ट्यून मोफत

देशातील सर्वात मोठी टेलीकॉम कंपनी एयरटेल ने याच महिन्यात 249 रुपयांचा एक नवीन प्लान सादर केला होता ज्यात रोज 2जीबी 4जी इंटरनेट डाटा दिला जात होता. पण आता आपल्या कस्टमर्स साठी कंपनी ने अजून एक 219 रुपयांचा प्लान सादर केला आहे जो फक्त खुप 4जी डाटा आणि अनलिमिटेड वॉयस कॉल देत नाही तर सोबत पूर्ण महिना मोफत कॉलर ट्यून लावण्याची संधी देतो.

एयरटेल ने 219 रुपयांचा प्लान सादर केला आहे जो प्रीपेड कस्टमर्स साठी आहे. हा प्लान 28 दिवसांच्या वॅलिडिटी सह येतो जो रोज 1.4जीबी 4जी इंटरनेट डाटा देतो. 1.4जीबी प्रतिदिन या हिशोबाने 219 रुपयांमध्ये एकूण 39.2जीबी 4जी इंटरनेट डाटा मिळत आहे.

यासोबतच एयरटेल च्या या प्लान मध्ये लोकल व एसटीडी आॅननेटवर्क तसेच आॅफनेटवर्क अन​लिमिटेड वॉयस कॉल देण्यात येत आहेत. हे वॉयस कॉल रोमिंग मध्ये पण वापरता येतील. एयरटेल च्या 219 रुपयांच्या प्लान ची एक मोठी खासियत या प्लान मध्ये मिळणारी फ्री हॅलो ट्यून आहे.

एयरटेल ने या प्लान मध्ये 28 दिवसांसाठी मोफत कॉलर ट्यून ची सुविधा पण दिली आहे. म्हणजे ग्राहक आपल्या आवडी नुसार कोणतेही गाणे हॅलो ट्यून च्या जागी लावू शकतात आणि ते देखील एकदम मोफत.