Home बातम्या Airtel यूजर्ससाठी वाईट बातमी, संपणार आहेत स्वस्त डेटाचे दिवस!

Airtel यूजर्ससाठी वाईट बातमी, संपणार आहेत स्वस्त डेटाचे दिवस!

देशात सुरु असलेले मोबाईल डेटा युद्ध संपण्याची चिन्हे दिसत आहेत. या डेटा युद्धात स्वतःला सिद्ध करण्यासाठी जवळपास सर्व कंपन्या रोज नवीन डेटा प्लान सादर करत आहेत. पण आता समोर आलेल्या एका बातमीनुसार हे जास्त दिवस चालणार नाही असे वाटत आहे. भारती एयरटेलचे चेयरमन सुनील भारती मित्तल यांनी केलेल्या विधानावरून असा अंदाज लावला जात आहे कि येत्या काळात एयरटेल यूजर्सना डेटासाठी जास्त किंमत मोजावी लागू शकते.

भारतीय एयरटेलचे चेयरमन सुनील भारती मित्तल यांनी टॅरिफ वाढण्याकडे इशारा केला आहे, ते म्हणाले कि 160 रुपयांमध्ये 16GB डेटा एक ट्रॅजेडी आहे. एका इवेंट मध्ये सुनील भारती मित्तल यांनी म्हटले आहे कि ‘या किंमतीत एक तर तुम्ही 1.6GB डेटा वापरा किंवा यासाठी जास्त किंमत देण्यासाठी तयार व्हा.’

विशेष म्हणजे एयरटेलचा पहिल्या तिमाहीत ARPU (Average Revenue Per User) वाढून 157 रुपये झाला आहे. ARPU मध्ये हि वाढ डिसेंबर 2019 मध्ये टॅरिफ वाढवल्यानंतर दिसली आहे. याबात ते म्हणाले कि ‘पुढचे 5-6 महीने एक ठोस ARPU ची गरज आहे, जेणेकरून इंडस्ट्री चालू राहील. तसेच टेलीकॉम इंडस्ट्री मध्ये आता आम्ही फक्त 2-3 खेळाडू राहिलो आहोत.’

ते पुढे म्हणाले कि भारत किंमतीच्या बाबतीत संवेदनशील बाजार आहे. पुढील सहा महिन्यात आम्ही 200 रुपये एआरपीयू निश्चितपणे पार करू आणि कदाचित 250 रुपये एआरपीयू आदर्श स्थिती असेल. यावरून अंदाज लावला जात आहे कि एयरटेल येत्या 6 महिन्यांत आपल्या प्लान्सच्या किंमती वाढवू शकते.

विशेष म्हणजे गेल्यावर्षी म्हणजे 2019 मध्ये 30 नोव्हेंबर नंतर रिलायंस जियो, एयरटेल, वोडाफोन-आइडिया आणि बीएसएनएल ने आपले रिचार्ज महाग केले होते. गेल्यावर्षी टेलिकॉम इंडस्ट्रीला तोट्यातून वर येण्यासाठी टॅरिफ महाग करण्यात आले होते. तर यावेळी समोर आलेल्या माहितीनुसार कोरोना वायरस लॉकडाउन मध्ये कंपन्यांसमोर समोर अचानक आलेल्या आवाहनांमुळे टॅरिफ प्लान्सची किंमत वाढवणे कंपन्यांना अनिवार्य आहे.