Home बातम्या Amazon Prime Day 2024 Sale: जाणून घ्या किती स्वस्त मिळतील स्मार्टफोन, सेल होणार या दिवशी सुरू

Amazon Prime Day 2024 Sale: जाणून घ्या किती स्वस्त मिळतील स्मार्टफोन, सेल होणार या दिवशी सुरू

जर तुम्ही ऑनलाईन सामान खरेदी करण्याचा विचार करत आहात तर अ‍ॅमेझॉन प्राईम डे सेल (Amazon Prime Day 2024 Sale) ची सुरुवात होणार आहे. यात युजर्सना स्मार्टफोन तसेच इतर प्रोडक्टवर मोठा डिस्काऊंट मिळत आहे. विशेष म्हणजे सेल सुरु होण्याच्या आधी ब्रँडने वनप्लस, सॅमसंग, अ‍ॅप्पल, रियलमी, आयक्यू, शाओमी सारख्या कंपनीच्या मोबाईलवर मिळणाऱ्या सूटची माहिती शेअर केली आहे. चला, पुढे जाणून घेऊया की सेल कधीपासून सुरु होईल आणि यात कोणत्या डिव्हाईसवर किती ऑफर मिळेल.

Amazon Prime Day 2024 Sale कधी होईल सुरू

अ‍ॅमेझॉन प्राईम डे 2024 सेल येत्या 20 जुलैला सुरु होईल आणि 21 जुलै पर्यंत चालेल. Amazon नुसार सेलमध्ये iPhone 13, Samsung Galaxy S24 Ultra, Galaxy S23 Ultra, OnePlus 12 आणि अलीकडेच सादर झालेला iQOO Z9 Lite 5G, Motorola Razr 50 Ultra तसेच Lava Blaze X फोन पण डिस्काऊंटवर उपलब्ध होईल.

या स्मार्टफोनवर मिळेल डील

तसेच प्लॅटफॉर्मवर OPPO F27 Pro+ 5G, iQOO Neo 9 Pro, iQOO Z9 lite, iQOO Z9x 5G, Redmi 13 5G, Vivo Y28s 5G, Vivo Y-Series स्मार्टफोन, Realme GT 6T 5 आणि Realme Narzo 70x सारख्या अनेक इतर फोनवर पण सूट देण्याचा वादा करण्यात आला आहे.