Home बातम्या Apple 15 एप्रिलला लॉन्च करू शकते आपले नवीन लो बजेट आयफोन्स iPhone 9 आणि iPhone SE 2

Apple 15 एप्रिलला लॉन्च करू शकते आपले नवीन लो बजेट आयफोन्स iPhone 9 आणि iPhone SE 2

Apple बाबत बोलले जात होते कि कंपनी 31 मार्चला आपले नवीन आयफोन्स टेक मार्केट मध्ये सादर करेल. काही ठिकाणी चर्चा होती कि यादिवशी कंपनी iPhone SE 2 आणि iPhone SE 2 Plus लॉन्च करेल तर अनेक रिपोर्ट मध्ये समोर आले होते कि 31 मार्चला iPhone 12 आणि iPhone 9 नावाचे नवीन आयफोन्स लॉन्च केले जाऊ शकतात. पण काही दिवसांपूर्वी समजले होते कि Coronavirus मुळे ऍप्पलला आपला लॉन्च ईवेंट पुढे ढकलावा लागला आहे. तर आता आयफोन लवर्ससाठी एक चांगली बातमी अशी समोर येत आहे ज्यात सांगण्यात आले आहे कि कंपनी येत्या 15 एप्रिलला टेक बाजारात आपला Apple iPhone सादर करेल.

Apple iPhone SE 2 सीरीजच्या लॉन्च डेटची माहिती लीकच्या माध्यमातून समोर आली आहे. एका टिप्सटरने दावा केला आहे कि ऍप्पल येत्या 15 एप्रिलला आपले नवीन आयफोन ग्लोबल मंचावर सादर करण्याची तयारी करत आहे. यादिवशी कंपनी आपले कमी किंमतीचे आयफोन लॉन्च करेल. लीकनुसार 15 एप्रिलला लॉन्च झाल्यावर हे फोन्स 22 एप्रिल पासून अंर्तराष्ट्रीय बाजारात सेलसाठी उपलब्ध होतील. विशेष म्हणजे ऍप्पलचे हे आगामी स्मार्टफोन्स iPhone SE 2 आणि iPhone SE 2 Plus नावाने लॉन्च केले जाणार असल्याची बातमी येत आहे, त्याचबरोबर अनेक रिपोर्ट्स मध्ये फोनचे नाव iPhone 9 असे समोर आले आहे.

iPhone SE 2

iPhone SE 2 बद्दल बोलले जात आहे कि Apple चा हा आगामी डिवाईस 5.4 इंचाच्या स्क्रीन वर लॉन्च केला जाईल. हि स्क्रीन साईज कंपनीच्या iPhone 8 स्मार्टफोन एवढी असेल. लीक मध्ये सांगण्यात आले आहे कि ऍप्पल आपला आगामी फोन iPhone SE 2 Face ID आणि 3D Touch फीचर सह बाजारात आणेल तसेच या फोन मध्ये नॉच नसेल.

Apple iPhone SE 2 बद्दल बोलायचे तर समोर आलेल्या रिपोर्ट्सनुसार हा फोन Apple A13 प्रोसेसर वर लॉन्च केला जाईल. विशेष म्हणजे हाच चिपसेट आपण Apple च्या लेटेस्ट आयफोन सीरीजच्या तीनही डिवाईस iPhone 11, iPhone 11 Pro आणि iPhone 11 Pro Max मध्ये पण मिळाला होता. लीक नुसार iPhone SE2 Apple 3 जीबी रॅम वर लॉन्च होईल जी LPDDR4X RAM मेमरी असेल. रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे कि Apple iPhone SE2 कंपनी द्वारा दोन स्टोरेज वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला जाईल ज्यात 64 जीबी स्टोरेज आणि 128 जीबी स्टोरेजचा समावेश असेल.

रिपोर्ट नुसार Apple iPhone SE 2 मध्ये कंपनी एलसीपी एंटिनाचा वापर करेल जो फोनची नेटवर्क व फ्रीक्वेंसी क्षमता 5.1 डेसीबल पर्यंत वाढवेल. तसेच फोन सह 5वॉट चा चार्जर दिला जाऊ शकतो. iPhone SE2 बाबत सांगण्यात आले आहे कि हा डिवाईस डीप ग्रे, वाईट आणि रेड कलर मध्ये लॉन्च केला जाईल. तसेच iPhone SE2 कंपनी $399 यूएस डॉलर मध्ये लॉन्च करेल. विशेष म्हणजे हि किंमत भारतीय करंसीनुसार 28,000 रुपयांच्या आसपास आहे. म्हणज हि बातमी जर खरी ठरली तर 30 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत लोक iPhone SE2 वापरू शकतील.

iPhone SE 2 Plus

आयफोन एसई 2 प्लस बद्दल बोलायचे तर समोर आलेल्या मीडिया रिपोर्टवरून समजले आहे कि हा स्मार्टफोन एलसीडी डिस्प्ले सह लॉन्च केला जाईल तसेच फोन मध्ये 5.5 इंचापासून 6.1 इंचापर्यंत मोठी स्क्रीन दिली जाईल. लीकनुसार iPhone SE 2 Plus पण Apple iPhone X प्रमाणे फुल स्क्रीन डिजाईन वर लॉन्च केला जाऊ शकतो तसेच या फोन मध्ये फेस आईडीच्या ऐवजी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर दिला जाऊ शकतो. Apple च्या या आगामी स्वस्त आयफोनसाठी कंपनीच्या अधिकृत घोषणेची वाट बघितली जात आहे.