ASUS नं आपल्या गेमिंग फोनच्या लाइनअपमध्ये नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन ROG Phone 7 आणि ROG Phone 7 Ultimate भारतात लाँच केले आहेत. दोन्ही फोन्सचे स्पेसिफिकेशन्स जवळपास सारखेच आहेत. फक्त अल्टिमेट मॉडेलमध्ये जास्त रॅम, जास्त स्टोरेज, कुलिंगसाठी AeroActive Portal आणि फोनच्या मागे इनकमिंग कॉस इत्यादी माहिती दाखवण्यासाठी PMOLED डिस्प्ले मिळतो. ROG म्हणजे Republic of Gamers हा एक गेमिंग ब्रँड आहे जो गेमिंग लॅपटॉपसह गेमिंग मोबाइल देखील लाँच करतो. त्यामुळे यात गेमिंगसाठी आवश्यक फीचर्ससह शक्तिशाली स्पेसिफिकेशन्स दिले जातात. नवीन आरओजी फोन 7 आणि आरओजी फोन 7 अल्टिमेटमध्ये देखील असेच स्पेक्स आहेत ज्यांची माहिती तुम्ही पुढे वाचू शकता.
असूस आरओजी फोन 7 आणि आरओजी फोन 7 अल्टिमेट मधील गेमिंग फिचर
- GameCool 7 cooling system
- AeroActive Cooler 7
- GameFX Audio
- AirTrigger system
या फोनमध्ये नवीन ROG Rapid-Cycle Vapor Chamber डिजाईनचा वापर करण्यात आला जी लिक्विड रिर्टन चॅनेल्सच्या माध्यमातून व्हेपर चेंबर कूलिंगच्या तुलनेत 2.1 गुणा जास्त हिट कमी करते. तसेच यातील एअर ट्रिगर अतिरिक्त गेमिंग बटन्स म्हणून कामी येतात.
असूस आरओजी फोन 7 आणि आरओजी फोन 7 अल्टिमेट चे स्पेसिफिकेशन्स
डिस्प्ले
- 6.78” AMOLED
- 165Hz Refesh Rate
- in-display fingerprint sensor
ROG Phone 7 5G फोन 20.4:9 अॅस्पेक्ट रेशियोवर बनला आहे ज्यात 2448 x 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेला 6.78 इंचाचा मोठा डिस्प्ले देण्यात आला आहे. ही स्क्रीन अॅमोलेड पॅनलवर बनली आहे जी 165हर्ट्ज रिफ्रेश रेट व 720हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करते. यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देखील मिळतो.
ही स्क्रीन 1000निट्स ब्राइटनेस आणि 1,000,000:1 कॉन्ट्रास्ट रेशियोला देखील सपोर्ट करते, त्याचबरोबर आय केयर टेक्नॉलॉजी देखील मिळते. स्क्रीनच्या सुरक्षेसाठी यात 2.5डी कोर्निंग गोरिल्ला ग्लास विक्टसची सुरक्षा मिळते. घामाने माखलेल्या हातांपासून वाचाण्यासाठी विशेष कोटिंग करण्यात आली आहे.
प्रोसेसर
- Android 13
- Qualcomm Adreno 740
- Qualcomm Snapdragon 8 Gen 2
ASUS ROG Phone 7 क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 ऑक्टाकोर प्रोसेसरवर चालतो जो 3.2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीडवर चालतो. तसेच ग्राफिक्ससाठी यात एड्रेनो 740 जीपीयू देण्यात आला आहे. हा आरओजी फोन अँड्रॉइड 13 वर लाँच झाला आहे ज्यात झेन युआय आणि आरओजी युआय दोन्ही मिळतात. असूसचा हा फोन 2 वर्षांच्या अँड्रॉइड अपडेट तसेच 4 वर्षांच्या सिक्योरिटी अपडेटसह येतो. फोनमध्ये LPDDR5X RAM आणि UFS4.0 Storage मिळते.
कॅमेरा
- 50MP Rear Camera
- 32MP Front Camera
फोटोग्राफीसाठी असूस आरओजी फोन 7 ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 50 मेगापिक्सलचा सोनी आयएमएक्स766 सेन्सर देण्यात आला आहे. जोडीला रियर कॅमेरा सेटअपमध्ये 13 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 8 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स देखील आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी ASUS ROG Phone 7 32 मेगापिक्सलच्या सेन्सरसह येतो जी एक ओमनी व्हिजन ओवी32 क्वॉड लेन्स आहे.
बॅटरी
- 6,000mAh Battery
- 65W Fast Charging
पावर बॅकअपसाठी या असूस फोनमध्ये ड्युअल बॅटरी पॅक देण्यात आला आहे. ज्यात 3,000एमएएचचे दोन बॅटरी सेल आहेत जे एकत्र 6,000एमएएचची पावर देतात. मोठी बॅटरी वेगानं चार्ज करण्यासाठी आरओजी फोन 7 मध्ये 65वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी देखील देण्यात आली आहे. विशेष म्हणजे फोन बॉक्समध्ये कंपनी 30वॉट पवार अडॅप्टर देईल.
आसूस आरओजी फोन 7 आणि आरओजी फोन 7 अल्टिमेट ची किंमत
- ASUS ROG Phone 7 (12GB RAM, 256GB) = 74,999 रुपये
- ASUS ROG Phone 7 Ultimate (16GB RAM, 512GB) = 99,999 रुपये
ASUS ROG Phone 7 मध्ये 12GB RAM आणि 256GB स्टोरेज असून याची किंमत 74,999 रुपये आहे. तर ASUS ROG Phone 7 Ultimate मध्ये 16GB RAM आणि 512GB स्टोरेज मिळते ज्यासाठी 99,999 रुपये मोजावे लागतील. ही सीरिज मे महिन्यात विक्रीसाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन उपलब्ध होईल. कंपनीनं नेमकी तारीख मात्र अजून सांगितली नाही.
