Home बातम्या फ्लॅगशिप फोन ASUS Zenfone 11 Ultra झाला जागतिक बाजारात लाँच, प्रत्येक स्पेसिफिकेशन आहे शक्तिशाली

फ्लॅगशिप फोन ASUS Zenfone 11 Ultra झाला जागतिक बाजारात लाँच, प्रत्येक स्पेसिफिकेशन आहे शक्तिशाली

ASUS Zenfone 11 Ultra लाँच झाला आहे. पावरफुल स्पेसिफिकेशन तसेच अ‍ॅडव्हान्स फिचर्ससह हा मोबाईल फोन जागतिक मार्केटमध्ये सादर करण्यात आला आहे जो सर्वप्रथम पश्चिमी देशांमध्ये सेलसाठी उपलब्ध आहे. हा एक फ्लॅगशिप स्मार्टफोन आहे ज्यात एकापेक्षा एक शाक्तिशाली स्पेसिफिकेशनचा वापर करण्यात आला आहे. पुढे तुम्ही असूस जेनफोन 11 अल्ट्राची किंमत व अन्य माहिती वाचू शकता.

ASUS Zenfone 11 Ultra डिझाईन

ASUS Zenfone 11 Ultra स्पेसिफिकेशन

स्क्रीन : हा मोबाईल फोन 2400 × 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.78 इंचाच्या फुलएचडी+ स्क्रीनवर लाँच करण्यात आला आहे. पंच-होल स्टाईल असणारा हा डिस्प्ले एलटीपीओ अ‍ॅमोलेड पॅनलवर बनला आहे जो 144हर्ट्झ पर्यंतच्या रिफ्रेश रेट आणि 2500 निट्स ब्राइटनेसला सपोर्ट करतो.

प्रोसेसर : ASUS Zenfone 11 Ultra अँड्रॉईड 14 आधारित जेनयुआयवर लाँच झाला आहे. प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये 4नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 3 ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच ग्राफिक्ससाठी हा फ्लॅगशिप फोन एड्रेनो 750 जीपीयूला सपोर्ट करतो.

बॅक कॅमेरा : फोटोग्राफीसाठी हा फोन ट्रिपल रिअर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. याच्या बॅक पॅनलवर एफ/1.9 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सल आयएमएक्स 890 सेन्सर, 32 मेगापिक्सल टेलीफोटो लेन्स तसेच 13 मेगापिक्सल अल्ट्रा वाइड अँगल लेन्स देण्यात आली आहे. हा कॅमेरा 6-अ‍ॅक्सिस गिम्बल स्टॅबिलायजेशन तसेच ओआयएस टेक्नोलॉजीसह आहे.

फ्रंट कॅमेरा : सेल्फी काढणे, रिल्स बनविणे तसेच व्हिडिओ कॉलिंगसाठी ASUS Zenfone 11 Ultra मध्ये 32 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. ही वाईड अँगल लेन्स 90° फिल्ड ऑफ व्यूला सपोर्ट करते.

बॅटरी : पावर बॅकअपसाठी या मोबाईल फोनमध्ये 5,500एमएएच बॅटरी देण्यात आली आहे. तसेच या बॅटरीला फास्ट चार्ज करण्यासाठी हा असूस स्मार्टफोन 65वॉट फास्ट चार्जिंग टेक्नोलॉजीसह करण्यात आला आहे. या फोनमध्ये 15 वॉट वायरलेस चार्जिंग टेक्नोलॉजी पण आहे.

ASUS Zenfone 11 Ultra फिचर्स

ASUS Zenfone 11 Ultra किंमत

असूस जेनफोन 11 अल्ट्राला जागतिक मार्केटमध्ये दोन व्हेरिएंट्समध्ये लाँच करण्यात आले आहे. याच्या मॉडेलमध्ये 12GB RAM + 256GB Memory देण्यात आली आहे ज्याची किंमत 999 Euros म्हणजे 90,500 रुपयांच्या आसपास आहे. यासोबत 16GB RAM + 512GB Memory असलेला ASUS Zenfone 11 Ultra 1099 Euros म्हणजे जवळपास 99,500 रुपयांमध्ये लाँच करण्यात आला आहे. सध्या या स्मार्टफोनच्या भारतातील लाँचची अपेक्षा कमी आहे.