Home बातम्या 8जीबी रॅम व 256जीबी मेमरी वाला असूस चा हा दमदार स्मार्टफोन लवकरच होईल लॉन्च, तोडू शकेल का फ्लॅगशिप चे सर्व रेकॉर्ड ?

8जीबी रॅम व 256जीबी मेमरी वाला असूस चा हा दमदार स्मार्टफोन लवकरच होईल लॉन्च, तोडू शकेल का फ्लॅगशिप चे सर्व रेकॉर्ड ?

टेक कंपनी असूस ने फेब्रुवारी मध्ये मोबाईल वर्ल्ड कांग्रेस 2018 च्या मंचावरून अंर्तराष्ट्रीय टेक जगासमोर आपला फ्लॅगशिप स्मार्टफोन झेनफोन 5झेड सादर केला होता. 8जीबी रॅम आणि सर्वात दमदार चिपसेट असलेला हा स्मार्टफोन कंपनी ने अजून पर्यंत बाजारात आणला नाही पण आता असे वाटते आहे की असूस लवकरच याला लॉन्च करू शकते. असूस झेनफोन 5झेड चीनी बेंचमार्किंग साइट वर लिस्ट करण्यात आला आहे आणि आता आशा आहे की कंपनी लवकरच हा फोन बाजारात घेऊन येईल.

असूस झेनफोन 5झेड गीकबेंच वर असूस झेड01आरडी कोडनेम सह लिस्ट करण्यात आला आहे. या लिस्टिंग मध्ये फोन चे काही स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत त्याचबरोबर स्पष्ट झाले आहे की असूस आता हा फोन बाजारात आणायला जास्त वेळ नाही लावणार. असूस झेनफोन 5झेड गीकबेंच वर 8 मे पर्यंत सिंगल-कोर मध्ये 2,471 स्कोर तसेच मल्टी-कोर मध्ये 9,209 स्कोर देण्यात आला आहे. तसेच काही दिवसांपूर्वी झेनफोन 5झेड स्मार्टफोन ला एनटूटू अॅप वरून 2,74,499 स्कोर मिळाला आहे.

असूस झेनफोन 5झेड बद्दल बोलायचे तर कपंनी ने हा फोन 2246 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाली 6.2-इंचाच्या फुलएचडी डिसप्ले वर सादर करण्यात आला आहे जो बेजल लेस आहे. हा फोन झेनयूआई आधारित एंडरॉयड ओरियो वर सादर करण्यात आला आहे जो 2.8गीगाहर्ट्ज आॅक्टा-कोर प्रोसेसर सह क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट वर चालतो. असूस चा या फोन मध्ये अॅप्पल आयफोन 10 च्या एनिमोजी प्रमाणे झेनीमोजी एआई स्टीकर आहेत.

गीकबेंच वर हा फोन 8जीबी च्या पावरफुल रॅम सह लिस्ट करण्यात आला आहे. तसेच फोन मध्ये 256जीबी ची इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. फोन च्या बॅक पॅनल वर 1.4माइक्रोन सोनी आईएमएक्स363 कॅमेरा सेंसर वाला 12-मेगापिक्सल आणि 8-मेगापिक्सल चा डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे जो एफ/1.8 अपर्चर ला सपोर्ट करतो. फोन मध्ये एआई चार्जिंग सपोर्ट वाली 3,300एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. बॅटरी मधील एआई टेक्निक मुळे तुम्ही रात्रभर चार्जिंग वर लाऊन झोपू शकता. बॅटरी टेक्निक या फोनला 80 टक्के चार्ज करून आपोआप थांबवेल ज्यामुळे फोन ची बॅटरी रात्रभर विनाकारण चार्ज होणार नाही.

असूस झेनफोन 5झेड मध्ये ब्लूटूथ 5.0, एनएफसी सारखे बेसिक कनेक्टिविफी फीचर्स देण्यात आले आहेत तसेच यातील एनएक्सपी स्मार्ट एम्प्लीफायर उत्तम आॅडियो क्वॉलिटी देतात. पण असूस ​कधी हा फोन बाजारात सादर करेल, याची किंमत काय असेल आणि झेनफोन 5झेड भारतात सेल साठी उपलब्ध होईल की नाही यासाठी असूस ची अधिकृत घोषणेची वाट बघितली जात आहे.