Home बातम्या 5,000 एमएएच बॅटरी, दमदार प्रोसेसर आणि नॉच स्क्रीन सह लॉन्च झाला असूस झेनफोन मॅक्स प्रो एम2

5,000 एमएएच बॅटरी, दमदार प्रोसेसर आणि नॉच स्क्रीन सह लॉन्च झाला असूस झेनफोन मॅक्स प्रो एम2

यावर्षी एप्रिल मध्ये असूस ने भारतीय मोबाईल बाजरात झेनफोन मॅक्स प्रो एम1 लॉन्च केला होता. हा फोन खूप लोकप्रिय झाला आणि अजूनही आपली पकड त्याने कायम ठेवली आहे. वर्षाच्या शेवटी कंपनी ने याचा अपग्रेड वर्जन सादर केला आहे. असूस ने झेनफोन मॅक्स प्रो एम2 आणला आहे जो जुन्या मॉडेल पेक्षा खूप अपग्रेडड आहे. भारतीय बाजरात असूस झेनफोन मॅक्स प्रो एम2 ची बेसिक किंमत 12,999 रुपये आहे. हा फोन 18 डिसेंबर पासून आॅनलाइन स्टोर फ्लिपकार्ट वर सेल साठी उपलब्ध होईल. लॉन्च सोबतच कंपनी ने काही आॅफर्स पण सांगितल्या आहेत.

असूस झेनफोन मॅक्स प्रो एम2 स्पेसिफिकेशन
फोनची बॉडी ग्लास पासून बनली आहे जिची क्वालिटी खूप चांगली आहे. बॅक पॅनल थोडा कर्व्ड आहे जो चांगला वाटतो. असूस झेनफोन मॅक्स प्रो एम1 मध्ये बेजल लेस डिस्प्ले होता तर कंपनी ने मॅक्स प्रो एम2 नॉच डिस्प्ले सह सादर केला आहे. स्क्रीनच्या वर नॉच मध्ये सेल्फी कॅमेरा आणि काही सेंसर्स मिळतील. असूस झेनफोन मॅक्स प्रो एम2 मध्ये 19:9 आसपेक्ट रेशियो वाली 6.3-इंचाची आईपीस एलसीडी स्क्रीन देण्यात आली आहे. हि फुल एचडी+ (2280×1080) रेजल्यूशन सह उपलब्ध आहे. फोनचा स्क्रीन टू बॉडी रेशियो 83.1 परसेंट आहे. स्क्रीन प्रोटेक्शन बद्दल माहिती देण्यात आलेली नाही.

झेनफोन मॅक्स प्रो एम2 को क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 660 चिपसेट वर सादर केला गेला आहे. या बजेट मध्ये आता पर्यंत फक्त रियलमी 2 प्रो मध्ये हा प्रोसेसर उपलब्ध आहे. मिड रेंजचा हा चिपसेट चांगली प्रोसेसिंग करतो. फोन मध्ये आॅक्टाकोर (4×2.2 गीगाहट्र्ज क्रयो 260 गोल्ड + 4×1.8 गीगाहट्र्ज क्रयो 260 सिल्वर) प्रोसेसर देण्यात आला आहे. हा फोन 3जीबी रॅम सह 32जीबी मेमोरी, 4जीबी रॅम सह 64जीबी मेमरी आणि 6जीबी रॅम सह 64जीबी वेरियंट मध्ये उपलब्ध आहे. या फोन मध्ये पण तुम्हाला कार्ड सपोर्ट मिळेल आणि 512जीबी पर्यंतच्या कार्डचा वापर करता येईल .

झेनफोन मॅक्स प्रो एम2 मध्ये डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. एक सेंसर 12-मेगापिक्सलचा आहे जो एफ/1.8 अपर्चर सह येतो. यात पीडीएएफ सपोर्ट आहे जो फास्ट फोकस साठी प्रसिद्ध आहे. कंपनीचा दावा आहे की याचा मोठा अपर्चर लो लाइट मध्ये पण चांगली फोटोग्राफी करू शकतो. तर दूसरा सेंसर 5-मेगापिक्सलचा आहे. हा सेंसर डेफ्थ सेंसिंग साठी आहे. एफ/2.4 अपर्चर सह हा 1.12 माइक्रोन पिक्सलला सपोर्ट करतो. सेल्फी साठी 13—मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. फोन मध्ये फोटोग्राफी साठी एआई सपोर्ट आहे जो फोटो इन्हांस करतो.

ड्युअल सिम आधारित असूस झेनफोन मॅक्स प्रो एम2 च्या मागील पॅनल मध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे. सोबत कंपनी ने यात फेस अनलॉक सारखे फीचर्स पण दिले आहेत. डेटा व कनेक्टिविटी साठी फोन मध्ये 3जी आणि 4जी वोएलटीई व्यतिरिक्त वाईफाई आणि ब्लूटूथ सपोर्ट पण मिळेल. हा फोन मोइक्रो यूसएबी 2.0 सपोर्ट सह येतो.

यह फोन एंडरॉयड आॅपरेटिंग सिस्टम 8.1 वर आधारि​त आहे. यात स्टॉक एंडरॉयड अर्थात प्योर एंडरॉयड देण्यात आला आहे आणि कंपनी ने याला एंडरॉयड 9 पाईचा अपडेट लवकरच देणार आहे.

पावर बॅकअप साठी इस फोन मध्ये 5,000 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. यात फास्ट चार्जिंग सपोर्ट नाही पण कंपनी ने 2 एंप्येरचा 5 वोल्ट चा​र्जर दिला आहे जो याला वेगाने चार्ज करेल.

असूस झेनफोन मॅक्स प्रो एम2 ची प्राइस आणि आॅफर्स
भारतीय बाजरात असूस झेनफोन मॅक्स प्रो एम2 च्या 3जीबी+32जीबी मॉडेलची किंमत 12,999 रुपये आहे. तर 4जीबी + 64जीबी साठी 14,999 रुपये द्यावे लागतील. तर 6जीबी + 64जीबी चा वेरियंट 16,999 रुपयांमध्ये उपलब्ध होईल. सोबत कंपनी 100जीबी गूगल ड्राइव स्टोरेज मोफत देत आहे. तसेच फोन नो कॉस्ट इएमआई मध्ये घेता येईल.